मुद्रा कर्ज योजनेंअंतर्गत अडीच कोटी रुपये धनादेशाचे वाटप
पुणे-भारतीय जनता पार्टी ओ बी सी आघाडी पुणे शहर आणि भारतीय जनता पार्टी पुणे कॅन्टोन्मेन्ट विधानसभा मतदार संघाच्यावतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या मुद्रा कर्ज योजनेंअंतर्गत अडीच कोटी रुपये धनादेशाचे वाटप नगरसेवक सुनील कांबळे व माजी नगरसेवक मनीष साळुंके यांच्याहस्ते करण्यात आले . सोमवार पेठमधील बँक ऑफ महाराष्ट्र सोमवार पेठ शाखेमध्ये झालेल्या या कार्यक्रमास बँक ऑफ महाराष्ट्रचे पुणे जिल्हा व्यवस्थापक सहाय्यक व्यवस्थापक अमर कुमार , पुणे विभाग उप व्यवस्थापक निरंजन पुरोहित , सोमवार पेठ शाखा व्यवस्थापक प्रमोद कहाळकर , कार्यक्रमाचे सयोजंक सतीश गायकवाड , जयप्रकाश पुरोहित , राजाभाऊ पाटील , चरणजितसिंग सहानी , उद्धव मराठे , पोपट गायकवाड , स्वाती धनगर , शंतनू जावळे , नईम शेख , संजय ओझा आदी मान्यवर व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .
यावेळी भारतीय जनता पार्टी ओ बी सी आघाडी पुणे शहर अध्यक्ष मनिष साळुंके यांनी सांगितले कि , मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत आज अडीच कोटी रुपयांचे धनादेशाचे वाटप करण्यात आले , यामध्ये छोट्या मोठ्या व्यावसायीकाना व नागरीकाना लाभ मिळावा . मंगळवार पेठ भागातील नागरिकांना धनादेश वाटण्यात आले .
नगरसेवक सुनील कांबळे यांनी सांगितले कि . मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत नागरिकांनी कर्जे घेऊन ती प्रामाणिकपणे फेडली पाहिजेत ,जेणेकरून त्यांना पुन्हा कर्जे बँकेनी दिली पाहिजेत . यावेळी लाभार्थीनी भारतीय जनता पार्टी ओ बी सी आघाडीचे आभार व्यक्त केले .
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व स्वागत कार्यक्रमाचे सयोजंक भारतीय जनता पार्टी ओ बी सी आघाडी पुणे शहर सरचिटणीस सतीश गायकवाड यांनी केले .