मुंबई-आज मनसे अध्यक्ष .राज ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथी गृह येथे भेट घेतली… कालच मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी अहमदनगर जिल्ह्या पाथर्डी तालुक्यातील जावखेड खालसा ह्या गावात जाऊन तिहेरी हत्याकांड झालेल्या जाधव कुटुंबियांची भेट घेतली…जाधव कुटुंबियांना भेटल्यावर राज यांनी त्यांचा दौरा अर्ध्यावर सोडून तत्काळ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय घेतला. या भेटी दरम्यान राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून पुढील गोष्टी निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे, जाधव कुटुंबियांच्या हत्याकांडात असलेल्या दोषींना कठोर शासन झाले पाहिजे, तसेच अश्या गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी द्रुतगती न्यायालये- विशेष न्यायालये उभारायला हवीत, पोलिस यंत्रणेमध्ये सुधारणा यायला हवी असून पोलिसांना अधिक अधिकार द्यायला हवेत, समाजातील द्रुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना कायमचा धाक कसा बसवता येईल याचा विचार करायला पाहिजे. या निवेदनाबरोबर राज ठाकरे यांनी उस उत्पादक शेतक-यांना प्रतीटन पहिला हप्ता रु.२५००/- आणि अंतिम दर रु..३०००/- मिळाला पाहिजे या मागणीचे निवेदनसुद्धा दिले आहे… मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये महाराष्ट्रातील विविध विषयासंदर्भात सुमारे २०-२५ मिनिटे चर्चा झाली, सुरवातीला राज ठाकरे यांनी गुलाबांचा पुष्पगुच्छ देवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले… या चर्चे दरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, आमदार शरद सोनावणे, मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर आदी उपस्थित होते…