Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मुंबई तोडू पाहणाऱ्या मोदींना शिवरायांचा आशीर्वाद कसा मिळेल ?-पृथ्वीराज चव्हाण

Date:

तुळजापूर : उद्धव ठाकरे , राज ठाकरे मोदींसह भाजपवर बरसात असताना , नारायण राणे यांच्यानंतर आता काँग्रेस चे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आता नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रावर सूड उगवू पाहत आहेत, महाराष्ट्रापासून मुंबई तोडू पाहणाऱ्या मोदींना छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद कसा मिळेल असा सवाल करीत महारष्ट्रातील जनतेने त्यांना वेळीच योग्य उत्तर गरजेचे आहे असे म्हटले आहे
मोदी यांनी JNPT कडचा सगळा व्यापार गुजरात बंदराकडे वळविला आहे , मुंबईचे महत्व कमी करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत असे गेल्या २४ सप्टेंबर रोजी नारायण राणे यांनी म्हटले होते आता चव्हाण यांनी हि महाराष्ट्राला मोदींपासून सावध राहण्याची गरज प्रतिपादित केली आहे
तुळजापूर येथे मंगळवारी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले , हि सागरी सुरक्षा अकॅडमीसारखे अनेक प्रकल्प गुजरातकडे वळविले जात आहेत. अवघ्या 15 दिवसांवर निवडणूक असताना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून महाराष्ट्रावर सूड उगवला जात असून, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षड्यंत्र रचणाऱ्या मोदींना राज्यातील जनतेने मतदानातून सडेतोड उत्तर द्यावे, राष्ट्रवादीने सरकारचा पाठिंबा काढून एकप्रकारे भाजपासोबत हातमिळवणी केली, असा आरोपही त्यांनी केला.
महाराष्ट्रापासून मुंबई तोडू पाहणाऱ्या मोदींना छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद कसा मिळेल, असा सवाल करीत गुजरातकडे जाणारी मुंबई महाराष्ट्राने १०५ जणांचे हौतात्म्य देऊन मिळविली. त्याचाच सूड मोदी उगवत असून, केंद्रात सत्ता आल्यानंतर मोदींनी रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाचे तीन विभाग गुजरातला नेले. मुंबईतील गोदी बंदरही गुजरातमध्ये हलविले. यामुळे अनेकांना बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार का? असा सवालही त्यांनी केला.
व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, नारायण राणो, शिवाजीराव पाटील निलंगेकर, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, तुळजापूरचे उमेदवार मधुकरराव चव्हाण, बसवराज पाटील आदींची उपस्थिती होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जलतरण स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलचा डंका,एकूण १० कांस्य पदके जिंकली.

पुणे, ५ डिसेंबर ः नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या...

पार्क मेदी वर्ल्ड लिमिटेडची 920 कोटी रु. ची प्राथमिक समभाग विक्री 10 डिसेंबर पासून

      प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 154  रुपये ते 162  रुपये...

पुणेकर दीपाली अमृतकर-तांदळे ठरल्या’मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स’

पिंपरी-चिंचवडच्या दीपाली अमृतकर-तांदळे यांना'मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स' किताबसमृद्ध...

मॅरेथॉन भवन मैदानात‘एक्सपो’ प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

पुणे- ३९ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन रविवार दिनांक...