दिग्दर्शक कबीर खान यांचा बहुचर्चित चित्रपट ‘बजरंगी भाईजान’ ने रसिकांची माने जिंकली असतानाच त्यांच्या आगामी ‘फँटम’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सैफ अली खान यात गुप्तहेराच्या तर कतरिना कैफ फोटो जर्नलिस्टच्या भूमिकेत आहे.सैफ अली खान पहिल्यांदाच कबीर खानसोबत सिनेमा करत आहे, तर कतरिनाने यापूर्वी कबीरसोबत ‘न्यू यॉर्क’ आणि ‘एक था टायगर’मध्ये काम केलं आहे. सैफ आणि कतरिनाची केमिस्ट्री यापूर्वी रेस चित्रपटात पाहायला मिळाली होती. फँटमचं शूटिंग काश्मीरमध्ये झालं असून हा चित्रपट लेखक हुसैन झैदी यांच्या ‘मुंबई अॅव्हेंजर्स’ या कांदबरीवर आधारित आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच मुंबईवरील हल्ल्याचं दृश्य दिसतं. त्यानंतर 26/11 हल्ल्याचा आरोपी हाफिज सय्यदचा व्हिडिओ असून त्यात ‘मुंबईवरील हल्ला मी केल्याचं सिद्ध करु शकलात का? मग 6 वर्ष काय झक मारलीत का?’ असा प्रश्न हाफिज विचारताना दिसतो. चित्रपटातल्या एका दृश्यात सैफ म्हणतो, ‘जर अमेरिका ओसामाला घरात घुसून मारते, तर आपण का नाही?’