मुंबईत १०८ रुग्णवाहिका सेवा हाय अलर्टवर
पुणे :
मुंबई मध्ये मुसळधार पावसाने निर्माण केलेली परिस्थिती लक्षात घेता राज्य शासनाची महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस (डायल १०८ रुग्ण वाहिका सेवा ) हाय अलर्ट वर ठेवण्यात आली आहे . आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत हे स्वत परिस्थितीवर देखरेख करीत आहेत ,अशी माहिती आज महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस चे मुख्य संचालन अधिकारी डॉ ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली
राज्य शासनाच्या वतीने आणी बी व्ही जी इंडिया लिमिटेड या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा देण्यासाठी डायल १०८ हि रुग्णवाहिका सेवा सुरु करण्यात आली असून तिचे मुख्य रीस्पोंस सेंटर पुण्यात औंध येथे आहे . एकूण ९३७ रुग्णवाहिका अत्यधुनिक उपकरणे आणी डॉक्टर सह राज्यभर कार्यरत आहेत .