नवी दिल्ली : देशातील सर्व प्रमुख रस्ते डांबराऐवजी सिमेंटचे बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे देशात सिमेंटच्या मागणीत प्रचंड वाढ होवून सिमेंट कंपन्यांची भरभराट होणार आहे रेल्वे प्रकल्पाविषयी केंद्र सरकारने आपले धोरण बदलले आहे. सरकारच्या धोरणातील बदलामुळे देशातील सिमेंट कंपन्यांचे मात्र फावणार आहे. नव्या धोरणानुसार आता देशातील सर्व प्रमुख रस्ते डांबराऐवजी सिमेंटचे बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे देशात सिमेंटच्या मागणीत प्रचंड वाढ होईल. या पार्श्वभूमीवर सिमेंट उत्पादन व्यवसायातील कंपन्यांची भरभराट होणार आहे. तसेच आता मान्सून देखील संपला असल्यामुळे सिमेंटच्या मागणीत वाढ होण्यास सुरुवात होणार आहे. परिणामी, सिमेंट कंपन्यांचा नफा वाढण्याच्या अपेक्षेने त्यांचे शेअर्स वधारण्याची शक्यता आहे.
रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ऐतिहासिक घोषणा करताना देशातील राष्ट्रीय राजमार्ग सिमेंटचे करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मजबूत, स्वस्त आणि टिकाऊ राजमार्ग मिळू शकतील. डांबराच्या तुलनेत सिमेंटचे हायवे २0-२५ टक्के स्वस्त असतील. गडकरी यांनी पर्यायी इंधनावर धावणार्या वाहनांच्या माध्यमातून पर्यावरण वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. अशा वेळी पाऊस लवकर समाप्त होण्याचे संकेत मिळाले असून देशात बांधकाम हंगाम लवकरच सुरू होऊन सिमेंटच्या मागणीत वाढ होणार आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्यासही वाव मिळणार आहे.
रस्ते धोरणामुळे सिमेंट कंपन्यांची होणार भरभराट
Date: