पुणे :
“समस्त माहेश्वरी समाज’ आणि संस्थांतर्फे “महेश नवमी’ उत्सवादरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 83 जणांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिरामध्ये 40 ते 50 महिलांना रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे रक्तदान करता आले नाही, अशी खंत भगीरथ राठी यांनी व्यक्त केली.
“अपनोंसे अपनी बात’ या युवती व महिला प्रबोधन कार्यक्रमाचे देखिल आयोजन करण्यात आले होते. यामध्ये युवराज जैन यांनी आजकालच्या महिलांना नोकरी, व्यवसायाबरोबरच कुटुंबाकडे देखिल लक्ष द्यायचे असते. यावेळी त्यांनी कशाप्रकारे संतुलन सांभाळावे याबाबत महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये सुमारे 300 महिला सहभागी झाल्या होत्या.
पुण्यातील “माहेश्वरी समाज’ आणि संस्थांतर्फे दिनांक 30 व 31 मे अशा दोन दिवसीय “महेश नवमी’ उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे उत्सवाचे आठवे वर्ष होते. यामध्ये विविध पुरस्कार वितरण समारंभ आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम ओसवाल बंधू समाज कार्यालय, शंकरशेठ रोड येथे हा कार्यक्रम झाला .
उत्सव समितीतर्फे जुगल किशोर पुंगालिया, गोविंद मुंदडा, त्र्यंबकदास मुंदडा, भगीरथ राठी, सुरेश नावंदर, पुष्पा तोष्णिवाल, राकेश माहेश्वरी, राजेंद्र डागा, सचिन चांडक, रामेश्वर लाहोटी, अशोक राठी, उमेश झंवर, अनिल राठी, जयप्रकाश सोनी, रमेश जाजु, धीरज मुंदडा, सुभाष भट्टड, शेखर सारडा आदी मान्यवर उपस्थित होते.