पुणे- शहराच्या विकासाकरिता स्मार्ट सिटी अंतर्गत करावयाच्या विविध विकास कामांबाबत नेमके कोणते कामास प्राधान्य द्यावे, कोणती विकास कामे करणे आवश्यक व क्रमप्राप्त आहेत याकरिता पुणे महानगरपालिका प्रशासनाचे वतीने नागरिकांची मतं जाणून घेण्याकरिता ‘‘माझं स्वप्न- स्मार्ट सिटी” स्पर्धापरिक्षा ऑनलाईन व पत्राद्वारे पहिल्या टप्प्यात आयोजित केली होती.
स्पर्धेचा दुसरा टप्पा ३ ऑगस्ट २०१५ ते ९ ऑगस्ट २०१५ पर्यंत होता. प्रथम टप्प्यात सुमारे ५ लाखापेक्षा अधिक नागरिकांनी संकेतस्थळास भेट दिली होती, तर सुमारे ६ हजारापेक्षा अधिक नागरिकांनी आपली मतं-सुचना नोंदविल्या होत्या.
वरीलप्रमाणे आलेल्या सुचना-मतं यापैकी ३० सुचना-मतं निवडण्यात येऊन यापैकी ५ सुचना-मतं यांच्या सर्वोत्तम निवडीकरिता दुसèया टप्प्यात स्पर्धा आयोजित करणेत आली.
त्यानुसार ऑनलाईन चांगल्या व नागरी हिताच्या कामांच्या प्राधान्यक्रमास नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळालेला असून ९ ऑगस्ट २०१५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ११ लाख ५७ हजार ५०८ नागरिकांनी पुणे मनपाच्या संकेतस्थळास भेट दिली तर प्रत्यक्षात ६३ हजार ५६ नागरिकांनी आपली मतं-सुचना नोंदविलेल्या आहेत. प्रथम टप्प्यातील मतं-सुचना नोंदविणेबाबत अर्थात दुसऱ्या टप्पा आकडेवारी पहाता दोन पटीपेक्षा अधिक नागरिकांनी मनपा संकेतस्थळास भेट दिली तर सुमारे पहिल्या फेरीच्या तुलनेत दहा पटीपेक्षा अधिक नागरिकांनी दुसऱ्या टप्प्यात मतं-सुचना नोंदविल्याचे दिसून येते.
वरीलप्रमाणे ५ सुचनांबाबत प्राप्त झालेल्या मतं-सुचना यांच्या आकडेवारीच्या विश्लेषणानुसार विकास कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करुन संबंधित व्यक्तींना (प्रथम ५ सुचना-मतं) आपल्या सुचना-मतं सविस्तर मांडण्याकरिता-सादरीकरणाकरिता तज्ञ परिक्षण समितीच्या निरीक्षणा अंतर्गत लवकरच संधी दिली जाणार असून या पाचपैकी तीन व्यक्तींच्या सुचना-मतं यांची तज्ञ समिती परिक्षणा अंतर्गत निवड होऊन संबंधितांना येत्या १५ ऑगस्ट २०१५ रोजी मा. महापौर, मा महापालिका आयुक्त यांचे हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.