पुणे-माजी नगरसेवक संजय नांदे यांचे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास निधन झाले. अमरनाथ यात्रेसाठी गेले असता बद्रीनाथ येथे ह्दयाच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे वडील ,पत्नी , मुले ,भाऊ असा मोठा परिवार आहे . धनकवडी येथील महापालिकेच्या एका प्रभागातून सुभाष जगताप , जयश्री कांबळे यांच्या समवेत ते निवडून आले होते . पद्मावती हून गुलाबनगर कडे जाणाऱ्या मार्गावर क्रांतिसूर्य महात्मा फुले चौक अर्थात तीन हत्ती चौकाची जी सुरेख निर्मिती झाली त्यात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता .नांदे हे मित्रांसमवेत अमरनाथ यात्रेला गेले होते. शनिवारी रात्री मुंबईहून विमानाने ते श्रीनगरला गेले. रात्री तिथे मुक्काम करून रविवारी त्यांनी अमरनाथच्या दिशेने कुच केले. सोमवारी रात्री त्यांनी सोनमर्गजवळील बालताल येथे मुक्काम केला. मंगळवारी सकाळी त्यांच्या सोबतचे काही मित्र घोडयावरून पुढे गेले. रामदास गाडे यांच्यासह नांदे चालत निघाले होते. सकाळी साडे नऊच्या सुमारास बालताल येथे काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांच्या छातीमध्ये दुखू लागले. त्यानंतर त्यांना लगेच रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला