पुणे :
केंद्र सरकारच्या महिला सक्षमीकरण अभ्यास समितीच्या अंदमान दौर्यात खासदार अॅड.वंदना चव्हाण सहभागी झाल्या होत्या. या दौर्यादरम्यान आदिवासी महिला, बचतगट आणि सरकारी प्रतिनिधींशी संवाद साधण्यात आला. या समितीने कोलकाता, चेन्नई, पोर्ट ब्लेअर येथेे ही भेटी दिल्या. कामाच्या ठिकाणी असलेली व्यवस्था आणि लैंगिक छळ तसेच तुरुंगातील महिलांच्या समस्या याचाही अभ्यास समितीने केला.
दि. 15 मे 20 मे दरम्यान हा अभ्यास दौरा आयेाजित करण्यात आला होता. एअर पोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडिया, एअर इंडिया, बँक ऑफ इंडिया अशा ठिकाणी उच्चपदस्थ महिलांची कामाची व्यवस्था आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अंदमान जेलमधील महिलांच्या भेटी घेउन त्यांना जामिन मिळतो का ? तेथे लैंगिक छळ कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली की नाही ? याबाबत अभ्यास करण्यात आला.
या समितीचा अहवाल संसदेत सादर करण्यात येणार आहे, असे खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी सांगितले.