पुणे:
महिलांमधील हार्मोनविकार या विषयावर महिला डॉक्टरांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ‘दीनानाथ मंगेशकर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या‘एन्डोक्रायनोलॉजी विभागा’तर्फे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन रविवार, दि. 8 मार्च 2015 या महिलादिनी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
‘दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील सौद बहावान सभागृहामध्ये (आठवा मजला, मेन बिल्डींग) या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला रूग्णांना व महिला डॉक्टरांना मधुमेह, थायरॉइड, स्थुलपणा, पॉलिसिस्टीक ओव्हरीज, ऑस्टिओपोरॅसिस यांसारख्या हार्मोनविकारांची माहिती मिळण्यासाठी तसचे या आजारांविषयी अनेक प्रश्न डॉक्टर व रूग्णांमध्ये असतात त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
महिलादिनाचे औचित्य साधून, डॉक्टर स्त्रियांचे प्रबोधन एक स्त्री व एक डॉक्टर म्हणून होणे गरजेचे आहे. त्याकरीता ही कार्यशाळा फक्त महिला डॉक्टरांसाठी आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. वैशाली देशमुख (एन्डोकायनोलॉजी विभाग प्रमुख) यांनी दिली.
डॉ. वैशाली देशमुख, डॉ. धनंजय केळकर, डॉ. अरूंधती खरे, डॉ. रमा वैद्य, डॉ.वगीश अय्यर, डॉ. प्रेमा वर्तकवी, डॉ. अनीश बहल, डॉ. अमेय जोशी, डॉ. नितीन पाटणकर, डॉ. गीता धर्माती, डॉ.चेतन देशमुख, डॉ.धनश्री भिडे, डॉ. संजय फडके हे तज्ज्ञ महिला डॉक्टरांसाठी ‘स्त्रीयांमधील हार्मोनविकार’ यासंबंधी प्रशिक्षण व जागरूकता याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.