दिल्ली येथे नुकत्याच आयोजित नवव्या भारतीय ऊर्जा परिषदेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला पहिला क्रमांकाचा ग्रीन ग्रीड अॅवार्ड तर द्वितीय क्रमांकाचा बेस्ट स्टेट पॉवर युटीलिटी अॅवार्डने नुकतेच गौरविण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या सहकार्याने आणि इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित परिषदेत केंद्गीय विद्युत प्राधिकारणाचे अध्यक्ष श्री. मेजर सिंग, माजी अध्यक्ष श्री. एच.एल. बजाज, ऊर्जा मंत्रालयाचे माजी सचिव श्री. अनिल राजदान व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महावितरणचे संचालक (संचालन) श्री. अभिजीत देशपांडे, वीज खरेदी विभागाच्या मुख्य अभियंत्या श्रीमती रंजना पगारे, कार्यकारी अभियंते श्री. जितेंद्ग फुले व श्री. मकरंद कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
महावितरणने विजेच्या मागणीचे व्यवस्थापन करण्यात लक्षणीय यश मिळविले आहे. सिंगल फेजिंग आणि गावठाण फिडर सेप्रेशन यामुळे सुमारेᅠ 5000 मेगावॅट विजेच्या मागणीचे व्यवस्थापन करणे शक्य झाले आहे. तसेच ऊर्जा बचतीसाठी एल.ई.डी बल्बच्या वाटपासह विविध अभिनव उपक्रम महावितरणने यशस्वीपणे राबविले त्यामुळे महावितरणला ग्रीन ग्रीड अॅवार्डच्या प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.
महावितरणच्यावतीने ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यात ग्राहकांसाठी सुविधा केंद्गे, तक्रार निवारणासाठी 247 ऑनलाईन सुविधा, ग्राहकाभिमुख विविध अत्याधुनिक सेवा, वीज बिल भरण्यासाठी मोबाईल अॅपसह वेगवेगळे उपयुक्त पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याशिवाय पायाभूत आराखडा अंतर्गत मोठया प्रमाणात विज वितरण प्रणालीची कामे झाली असल्यामुळे ग्राहक सेवेचा दर्जा उंचावला आहे. या सर्व बाबींची दखल घेत महावितरणला द्वितीय क्रमांकाचा बेस्ट स्टेट पॉवर युटीलिटी अॅवार्ड प्रदान करण्यात आला.
राज्य शासनाच्या भरीव सहकार्यामुळे भविष्यात ग्राहकांना आणखी वाजवी दरात वीज, कृषिपंपांना मोठया प्रमाणात वीजजोडणी व पायाभूत आराखडयाद्वारे वीज व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा करण्याचा प्रयत्न महावितरणद्वारे केला जात आहे, अशी प्रतिक्रिया संचालक (संचालन) श्री. अभिजीत देशपांडे यांनी या परिषदेत व्यक्त केली.

