पुणे, दि. 04 : महावितरणच्या मुळशी विभागातील 5 ग्रामपंचायतींमध्ये एका दिवसात विविध प्रकारचे 1195 कामे गुरुवारी (दि. 3) पूर्णत्वास गेली. यात 329 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या तर 866 कामांमध्ये वीजदेयके व विविध ठिकाणी वीजयंत्रणेच्या दुरुस्ती कामांचा समावेश आहे.
महावितरणच्या त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रमातील उपक्रम मुळशी विभागातील (कंसात उपविभाग) लोणीकंद (हडपसर ग्रामीण), थेऊर (उरळीकांचन), खानापूर व गोरे बुद्गुक (मुळशी), कापुर ओहोळ (नसरापूर) या ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात आला. या पाच ग्रामपंचायतींमध्ये महावितरणच्या वतीने मागेल त्यांना वीजजोडणीमध्ये एकूण 329 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. सोबतच 169 वीजदेयकांची दुरुस्ती करण्यात आली. 22 सदोष व नादुरुस्त मीटर बदलण्यात आले. ज्या मीटरचे रिंडींग घेतले जात नव्हते अशा 110 मीटरचे रिंडींग घेण्यात आले. 12 वीजग्राहकांच्या नावांत बदल करून देण्यात आला. वीजदेयकाबाबत तक्रारी दूर करण्यासाठी या कार्यक्रमात एकूण 325 कामे करण्यात आली.
याशिवाय वीजयंत्रणेमधील वाकलेले वीजखांब सरळ करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स व किटकॅट बदलणे, रोहित्रातील तेलाची पातळी वाढविणे, तारांमधील झोल काढणे, वीजखांबाला रंगकाम, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणार्या झाडाच्या फांद्या तोडणे आदी प्रकारचे एकूण 541 कामे पूर्ण करण्यात आली.
लोणीकंद येथील ‘त्रिसुत्री’ कार्यक्रमाचे पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रदीप कंद यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी लोणीकंदच्या सरपंच सौ. लक्ष्मी कंद, उपसरपंच श्री. सोपान कंद उपस्थित होते. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी लोणीकंद व थेऊन येथे भेट देऊन त्रिसुत्री कार्यक्रमातील विविध कामांची पाहणी केली व यावेळी त्यांनी महावितरणचे कर्मचारी व ग्राहकांशीही संवाद साधला.
त्रिसुत्री कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे, मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्ग पवार, उपकार्यकारी अभियंता सर्वश्री किरण सरोदे, राहुल डेरे, राजेंद्ग भुजबळ, कल्याण गिरी यांच्यासह प्रत्येक ग्रामपंचायतींध्ये संबंधीत उपविभागातील सुमारे 90 ते 95 अभियंते व कर्मचारी त्रिसुत्री कार्यक्रमासाठी दिवसभर कार्यरत होते. वीजयंत्रणा, नवीन वीजजोडणी, वीजदेयकांबाबत असलेल्या तक्रारी एकाच दिवशी निकाली निघाल्याने ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचे स्वागत केले.
पुणे जिल्हा परिषदेच्या बैठकीत ‘त्रिसुत्री ‘ – महावितरणने मंचर, मुळशी व राजगुरुनगर विभागातील प्रत्येकी पाच ग्रामपंचायतींमध्ये दर गुरुवारी त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन सुरु केले आहे. याबाबत पुणे जिल्हा परिषदेत काल झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रदीप कंद, उपस्थित पदाधिकारी व सदस्य यांना त्रिसुत्री कार्यक्रमाबाबत कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्ग पवार यांनी माहिती दिली.