पुणे : पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. निळकंठ वाडेकर मंगळवारी (ता. 30) महावितरण
कंपनीमधून सेवानिवृत्त झाले. परिमंडलातील अभियंता, अधिकारी व कामगार संघटनांच्या वतीने त्यांना भावपूर्ण
तत्कालिन विद्युत मंडळ व सध्याच्या महावितरण कंपनीत श्री. निळकंठ वाडेकर यांनी 34
वर्ष सेवा दिली आहे. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून ते ऑगस्ट 2013 पासून
कार्यरत होते. या कार्यकाळात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. पुणे परिमंडलाचा मासिक
महसूल त्यांच्या कार्यकाळात सुमारे 12 टक्क्यांनी वाढला आहे. देयकांच्या वसुलीचे प्रमाण
दरमहा 100 टक्क्यांपेक्षा अधिक राहिले आहे. सद्यस्थितीत पुणे परिमंडलाची वीजहानी 9
टक्के दरम्यान असून ती राज्यात इतर परिमंडलांच्या तुलनेत सर्वात कमी आहे, हे
पारदर्शी प्रशासनासाठी आग्रही श्री. वाडेकर यांनी महावितरणच्या ग्राहकसेवेत अनेक बदल घडवून आणले आहे.
ग्राहकांना वीजविषयक सर्व सेवा तात्काळ व तत्पर मिळण्यासाठी महावितरण अंतर्गत विविध सुधारणा केलेल्या आहेत.
नवीन वीजजोडणीमध्ये अडथळे आल्यास मुख्य अभियंत्यांपर्यत थेट तक्रार करण्याची सेवा त्यांनी उपलब्ध करून दिली
होती. सोबतच वीजविषयक तक्रारी थेट कार्यकारी अभियंता यांच्याकडे मांडण्यासाठी दरमहा ग्राहक तक्रार निवारण
दिनाचे आयोजन त्यांनी लोकाभिमुख केले. इन्फ्रा योजनेच्या टप्पा दोनमध्ये 964 कोटींच्या प्रस्तावित कामांसाठी पुणे व
पिंपरी चिंचवड शहरातील खोदाई शुल्काचा तिढा त्यांनी समन्वय साधून मार्गी लावण्यास पुढाकार घेतला होता. यात
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेने महावितरणच्या विनंतीनुसार 2300 रुपये प्रतीमीटर खोदाई शुल्क मंजूर केल्याने
इन्फ्रा दोनच्या अंमलबजावणीला सुरवात झाली आहे. अभ्यासू व लोकाभिमुख प्रशासनासाठी श्री. निळकंठ वाडेकर
यांचा नावलौकीक आहे. महावितरणचे मुख्यालय, भांडुप, पेण आदी ठिकाणी सेवा दिल्यानंतर मंगळवारी (ता. 30) श्री.
निळकंठ वाडेकर पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाले.