‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क विधेयक’ आज विधानसभेत मंजूर-
मुंबई- ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क विधेयक’ आज विधानसभेत मंजूर करण्यात आले. . यामुळे शासनाच्या विविध विभागांच्या 110 प्रकारच्या सेवा निश्चित कालावधीत प्राप्त करण्याचा अधिकार नागरिकांना मिळणार आहे. या विधेयकांतर्गत येणा-या सेवांची संख्या यापुढील काळात वाढणार आहे. त्यामुळे सरकारी बाबूंना यापुढे वेळेत कामे करावी लागतील व कर्तव्यदक्ष रहावे लागेलअसे मानले जाते , दरम्यान पावसाळी अधिवेशनात वादळी वाऱ्याची, गडगडाटाची शक्यता आहेच . भाजप सरकारच्या निषेधार्थ विरोधकांनी सभागृहाबाहेर प्रतिसभागृह चालवलं होतं. तिथे जाऊन जितेंद्र आव्हाड आणि विरोधकांनी , उद्धव हमारे साथ है, ये अंदर की बात है, असे नारे द्यायला सुरुवात केली. त्याच्या आवाजात त्यांच्या सहकाऱ्यांनीही आवाज मिसळला आणि विधानभवन दणाणून सोडलं.