पुणे : दोन गटात झालेल्या राड्यानंतर पुढे ढकललेली महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या मंगळवारी (दि. १०) होणार आहे. पुणे स्टेशनजवळच्या सहकारी संघ सभागृहात दुपारी बारा वाजता मतदान होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पंचवर्षिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेलला कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या संजीव कुसाळकर यांच्या परिवर्तन पॅनलने पराभूत केले होते. त्यानंतर गेल्या महिन्यात १९ तारखेला राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपद, उपाध्यक्ष आणि सचिव पदासाठी मतदान होते. त्यासाठी नवनिर्वाचित २१ सदस्य आले होते. त्यातील १० सदस्यांनी भाजप पुरस्कृत पॅनेलच्या बाजुने होते. तर ११ सदस्यांचा आघाडी पुरस्कृत कुसाळकर पॅनलला पाठिंबा होता.
त्यावेळी मतदानाची कार्यक्रमपत्रिका मिळाली नसल्याचे कारण सांगत भाजप पुरस्कृत सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच, मतदान कक्षातील टेबल-खुर्च्या भिरकावून दिल्या. या गोंधळाचा व्हिडिओ प्रसारीत झाला होता. त्यात भाजप पुरस्कृत पॅनलचे भिकाजी पार्ले