साहित्य -संस्कृती -देशभक्ती अशा सर्वच पातळीवर महाराष्ट्र म्हणजे भारताला मिळालेली एक अमुल्य देणगी आहे जी भारताला समृद्धतेकडे नेत राहील असे प्रतिपादन येथे प्रसिध्द अभिनेता मुकेश तिवारी यांनी केले ऍड.उज्ज्वल निकम हि देखील महाराष्ट्रानेच भारताला दिलेली एक देणगीच आहे आणि त्यांच्या जीवनावरिल मराठी चित्रपटात मला काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे असेही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले . ‘आदेश – पॉवर ऑफ लॉ ‘ या मराठी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी तिवारी येथे आले होते त्यावेळी ते बोलत होते . हा चित्रपट मराठी त असला तरी नंतर तो तमिळ , तेलगु आणि बंगाली भाषेत हि डब करून प्रसारित केला जाणार आहे असे यावेळी लेखक आणि निर्माते संविधान आंग्रे यांनी सांगितले .
मुकेश तिवारी यावेळी बोलताना पुढे म्हणाले ,”महाराष्ट्राला संतांची भूमी आहे असे म्हटले जाते , येथेच साहित्य आणि संस्कृती या परंपरेचा मूळ स्त्रोत आहे भारतात कुठे हि नाही अशी येथे .चित्रपट आणि नाटक याबाबतची धोरणे राबविली जातात .हिंदी सिनेमाची देखील महाराष्ट्र हीच कर्मभूमी आहे . जुने चित्रपट ,नाटके , संगीत येथे कधी हि कालबाह्य होत नाही . कितीही खडतर अवस्था आली तरी त्यामुळे येथील रंगभूमी जिवंतच राहील रंगभूमी हाच सिनेमा सृस्तीचा आत्मा आहे सध्या शॉर्ट फिल्म मोठ्या संख्येने होत आहेत . फायदा -तोटा याचा विचार न करता चित्रपट -नाटक आणि रंगभूमी वेगाने पुढे जाते आहे येथील रसिकता च त्याला कारणीभूत आहे प्रशिक्षण घेवूनच अभिनय करावा किंवा या सृष्टीत उतरावे असे काही नाही इच्छ्याशक्ती मनापासून आहे तो येथे आज न उद्या यश प्रस्थापित करतोच करतो नाना पाटेकर -कमाल हसन हि उदाहरणे यासाठी देता येतील आज सिनेमा क्षेत्रात हि चांगले परिवर्तन मला जाणवते आहे पूर्वी मराठी सिनेमा २५ लाखात होत आता तो २ करोड च्या पुढे कधी सरकला हे समजले हि नाही प्रत्येकाची इमेज हि आता बदलते पूर्वी चित्रपटात एक -दोन विनोदी कलाकार असत , तसेच खलनायक असत आणि नायक असत , आता जो नायक आहे तोच कॉमेडीयन हि असू शकतो आणि तोच काह्ल्नायक हि असू शकतो लाईफ स्टाईल बदलते आहे तसा सिनेमाही बदलतो आहे आणि पारंपारिक दर्शक हि बदलतो आहे भोजपुरी सिनेमांवर मात्र यावेळी मुकेश तिवारी यांनी टीका केली केवळ आयटम सॉंग साठी पेट्रोल पंप विकून सिनेमा काढणारी प्रवृत्ती किती दिवस तग धरेल असे ते म्हणाले
ते पुढे म्हणाले ,1993 पासून शासनाचे विशेष सरकारी वकील म्हणून कामकाज पाहणाऱ्या उज्व्वल निकम यांनी दहशतवाद्यांविरुद्ध सन 1993 चा मुंबई बॉम्बस्फोट खटला, कल्याण लोकल रेल्वे बॉम्ब स्फोट खटला, गेट वे ऑफ इंडिया व झवेरी बाजार बॉम्ब स्फोट खटला व नुकताच हॉटेल ताज, ओबेरॉय येथे झालेला दहशतवादी हल्ल्याचा पाक अतिरेकी अजमल कसाब यांचा खटला, वेगवेगळे संवेदनशील खटले अतिशय कर्तव्यदक्षपणे हाताळून भारतीय कायद्याचे आणि भारताचे रक्षण करण्याचेच काम केले आहे ऍड. निकम यांनी आतापर्यंत चालविलेल्या विविध खटल्यात एकूण 628 कुख्यात आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा तर 37 गुन्हेगारांना मृत्यू दंडाची शिक्षा झालेली आहे.ऍड. निकम यांनी यापूर्वी देखील एक डिसेंबर 10 ला संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा बैठकीत “दहशतवाद’ या विषयावर भारत सरकारचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांना डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठातर्फे (पुणे) माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते कायदा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल डॉक्टरेट ही पदवी नुकतीच बहाल करण्यात आली आहे. तसेच त्यांना वेगवेगळ्या संघटनांमार्फत आतापर्यंत एकूण 65 पुरस्कार प्राप्त झाले आहेत.आज आपल्यात नसलेल्या देशभक्तांवरील चित्रपटात मला कामे करण्याची संधी मिळाली पण आज हि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बनविलेल्या घटनेचे आणि त्याद्वारे भारताचेच प्रामाणिकपणे आणि कौशल्याने रक्षण करणाऱ्या उज्ज्वल निकामांवरील चित्रपटात वकिलाची भूमिका करण्याचे काम मला करण्याची संधी मिळाली याचा विशेष आनंद आहे . सह निर्माता दिनेश पुजारी , योगेश वणवे यांनी सांगितले कि संविधान आंग्रे यांनी या चित्रपटाच्या निर्मिती साठी काही वर्षे मेहनत घेतली . अशा प्रकारे सरकारी वकिलाच्या जीवनावर येणारा हा पहिलाच चित्रपट आहे दिवाळी पर्यंत तो प्रदर्शित करण्याचा आमचा प्रयत्न आहे काही मोजक्या खटल्यांचा यात समावेश करण्यात आला असून अवास्तववादाला टाळून तो करण्यात येतो आहे त्यामुळे ऐक्शन – थ्रिलर यांचा अति वापर येथे नसेल मात्र केसेस च्या कथानाकाप्रमाणे १ आयटम सॉंग आणि अन्य २ गाणी यात असतील ती अजून चित्रित व्हायची आहेत सुमारे ८० टक्के चित्रीकरण पूर्ण झाले आहे . दीपक सवाखंडे या चित्रपटाचे सहदिग्दर्शक असून सिनेमोटोग्राफी दिलीपकुमार डोंगरे यांची आहे अशोक शिंदे , अनंत जोग ,मिथिला नाईक , हेमंत वनारसे यांच्या यात भूमिका आहेत संविधान आंग्रे हे स्वतः उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारत आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची भूमिका प्रथमच पुण्यातील पत्रकार शरद लोणकर साकारीत आहेत