महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, तर्फे सलग 6व्या वर्षी ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ सप्ताहाचे आयोजन

Date:

पुणे :
  ‘महात्मा गांधी जयंती’ निमित्त ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’, कोथरूड यांच्यावतीने येथे दिनांक 1 ते 7 ऑक्टोबर 2015 दरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे यंदाचे हे सहावे वर्ष आहे. गांधी सप्ताहाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते  दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे अनंत दीक्षित (ज्येष्ठ पत्रकार),  फ्रान्सिस दिब्रिटो (ज्येष्ठ विचारवंत) हे असणार आहेत, अशी माहिती ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ चे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी आणि सचिव अन्वर राजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सप्ताहाबद्दल माहिती देताना डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले ‘महात्मा गांधींजींची विचारसरणी, त्यांच्या चारित्र्याचा प्रभाव नेमका कसा होता हे नव्या पिढीला सांगणे आजही अत्यावश्यक आहे. त्या विचारांचे स्मरण करण्याच्या निमित्ताने या सप्ताहात गांधी भवनात विविधांगी कार्यक्रम होत आहेत.’
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ (पुणे) या संस्थेच्या अध्यक्षपदावर नियुक्त होऊन झालेल्या 8 वर्षांच्या कालावधीतील अनेक सामाजिक उपक्रमांविषयी माहिती देताना ते म्हणाले, गांधी विचार रुजवताना संस्थेने केलेले प्रयत्न, शांतीदल प्रशिक्षणाबद्दल अनुभव सांगितले.यंदाच्या सप्ताहाची वैशिष्टये म्हणजे  ‘संविधान समजून घेताना’ या विषयावर कार्यशाळा, ज्येष्ठ अभ्यासक डॉ. एन.जी. राजूरकर यांचे व्याख्यान  आणि सत्यपाल महाराज यांचे सप्तखंजिरी किर्तन होणार आहे. तसेच या सप्ताहात खादी, हातमाग व इतर गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन दुपारी 3.00 ते 9.00 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. सप्ताहाचा समारोप 7 ऑक्टोबर रोजी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे.
गांधी सप्ताहातील कार्यक्रमांचा तपशील : 
शुक्रवार दि. 2 ऑक्टोबर रोजी : सकाळी 8.30 वाजता शुभांगी मुळे व सहकारी प्रार्थना भजन सादर करतील.
गांधी जयंती (दिनांक 2 ऑक्टोबर) हा दिवस ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून पाळला जातो. या निमित्ताने ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’तर्फे  ‘शांती मार्च’चे आयोजन करण्यात  येते. हा ‘शांतीमार्च’ सकाळी 9 वाजता (सेनापती बापट पुतळा येथून सुरूवात होऊन अलका टॉकीज चौक ते शनिवार वाडा येथे समारोप),
दुपारी 3 वाजता : दिग्दर्शक श्याम बेनेगल प्रस्तुत ‘मेकिंग ऑफ महात्मा’ हा चित्रपट दाखविण्यात येईल.
सायंकाळी 6 वाजता डॉ. प्रमोद गायकवाड आणि नम्रता गायकवाड हे शहनाई वादन सादर करतील.
शनिवार, दि.3 ऑक्टोबर रोजी :  सकाळी 10 ते 5.30 वाजता ‘संविधान समजून घेताना’ या विषयावर कार्यशाळा मार्गदर्शक प्रा. डॉ. उल्हास बापट, प्रा. नितीश नवसागरे.
सायंकाळी 6 वाजता : स्वरांजली: शास्त्रीय गायन व भजन – ज्येष्ठ गायक उपेंद्र भट
रविवार, दि. 4 ऑक्टोबर रोजी : सकाळी 10 वाजता जादूचे प्रयोग सादरकर्ते – जादूगार संजय रघुवीर, दुपार सत्रात ‘आरक्षण’ या विषयावर कार्यशाळा प्रमुख मार्गदर्शक प्रा. प्रकाश पवार (शिवाजी विद्यापीठ, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख, कोल्हापूर),
सायंकाळी 6 वाजता : सप्तखंजिरी कीर्तन सादरकर्ते सत्यपाल महाराज.
सोमवार, 5 ऑक्टोबर रोजी : दुपारी 4 वाजता चित्रपट ‘दि ग्रेट डिक्टेटर’.
सायंकाळी 6 वाजता : ‘रोेल ऑफ पंडीत  नेहरू इन इंडियन पॉलिटिक्स – बी फोर अ‍ॅण्ड आफ्टर इंडिपेन्डन्स’: मार्गदर्शक डॉ. एन. जी. राजूरकर.
मंगळवार, 6 ऑक्टोबर रोजी : दुपारी 3 वाजता चित्रपट ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस अय्यर’.
सायंकाळी 6 वाजता स्वरांजली : शास्त्रीय गायन व भजन : सादरकर्ते ज्येष्ठ गायक पंडीत शौनक अभिषेकी.
बुधवार दि. 7 ऑक्टोबर 2015 रोजी : सायंकाळी 6 वाजता, गांधी सप्ताहाचा समारोप : शरद पवार (माजी केंद्रीय मंत्री) यांच्या हस्ते. प्रमुख उपस्थिती खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करा-खासदार मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेत मागणी

शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेकडे वेधले लक्ष वर्षाकाठी १० हजार कोटींचे आर्थिक...

पुण्यात हिंदू महासभा रिंगणात:महापालिका निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर

पत्रकार परिषदेत प्रदेश कार्यकारिणीकडून माहिती पुणे:अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी...

अवैध मद्य तस्करीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 48 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे, दि. 18 डिसेंबर : परराज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध...