महापौर ,उप महापौर ,स्थायी समिती अध्यक्षांचा मुस्लिम बॅंकेतर्फे सत्कार — सामाजिक सलोख्यातून पुण्याचा लौकिक वाढविणार :प्रशांत जगताप
पुणे :
‘ सर्व धर्मियांचा ,विचारधारांचा सन्मान करणारे शहर या रुपात लहानपणापासून पुण्याला पाहत आलेला असल्याने कॉस्मोपोलिटन पुण्यातील सामाजिक सलोखा राखणे आणि सर्वांच्या समन्वयाने पुण्याच्या स्मार्ट लौकिकात भर घालण्याला माझे प्राधान्य राहील ‘ अशी ग्वाही शनिवारी महापौर प्रशांत जगताप यांनी दिली .
दि मुस्लिम को ओपरेटीव्ह बँक तर्फे आयोजित नवनियुक्त पालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड पदाधिकारयांचा सत्कार समारंभात ते बोलत होते . कॅम्प परिसरातील बँक मुख्यालयात हा कार्यक्रम झाला
बँकेचे अध्यक्ष पी ए इनामदार यांच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते महापौर प्रशांत जगताप ,उप महापौर मुकारी अलगुडे ,स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके , पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डचे उपाध्यक्ष दिलीप गिरमकर ,नगरसेवक फारूक इनामदार यांचा सत्कार करण्यात आला . त्यावेळी महापौर बोलत होते .
ते म्हणाले ,’ वानवडी सारख्या कॉस्मोपोलिटन प्रभागातून मी निवडून आल्याने मला सर्व धर्मियांशी मिळून मिसळून राहण्याची सवय आहे . महापौर पदी नियुक्ती होताना हा घटक महत्वाचा ठरला . सर्व धर्म ,पंथ ,समुदायांचे सण ,त्यातील सलोखा हे पुण्याचे वैशिष्ट्य आहे . कॉस्मोपोलिटन पुण्यातील सामाजिक सलोखा राखणे आणि सर्वांच्या समन्वयाने पुण्याच्या स्मार्ट लौकिकात भर घालण्याला माझे प्राधान्य राहील ‘
पी ए इनामदार म्हणाले ,’ पुण्याची प्रतिमा देशातील पुरोगामी आणि सलोखा राखणारे ,त्यातून प्रगती करणारे शहर अशी आहे . ही प्रतिमा उंचावण्याचे कार्य सर्व पदाधिरयानी करावे . प्रत्येकाचा धर्म घरापुरता मर्यादित राहील आणि सार्वजनिक कार्यात राज्यघटनेचा आदर्श राहील असेच वातावरण पुढील काळात अपेक्षित आहे . ‘
मुकारी अलगुडे ,बाळासाहेब बोडके ,दिलीप गिरमकर यांनीही मनोगत व्यक्त केले .
अझीम गुडाकूवाला यांनी प्रास्ताविक केले . यावेळी बँकेचे संचालक -कर्मचारी वर्ग , बँकेचे सचिव जंगबहादूर मंद्रूपकर, नगरसेवक महेंद्र पठारे ,अयुब शेख ,एस ए इनामदार ,इक्बाल शेख ,कासम शेख ,लुकमान खान ,तस्लीम खान इत्यादी उपस्थित होते