पुणे- शहरातील जास्त रहदारी असलेले नो हॉकर्स म्हणून घोषित केलेल्या ४५ मुख्य रस्त्यांवरील तसेच
जास्त वर्दळ व रहदारी असलेल्या १५३ चौकांमधील रस्ता पदपथावरील सर्व प्रकारची अतिक्रमणे व या रस्त्यांचे व
चौकाचे लगत असलेल्या खाजगी मिळकतीमधील व्यावसायिकांची अतिक्रमणे, अनधिकृत बांधकाम इ. व सर्व संबंधित
विभागामार्फत संयुक्त कारवाई अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागामार्फत चालू करण्यात आली असून या
मोहिमे अंतर्गत कारवाई करुन सर्व क्षेत्रिय कार्यालयांच्या हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावरील स्टॉल ४, हातगाडी ४३,
पथारी ७३, इतर १२ अशा एकूण १३२ अनधिकृत व्यवसायधारकांवर कारवाई करुन रस्ता, पदपथ अतिक्रमण मुक्त
करण्यात आलेले आहेत. तसेच घोले रोड व विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयाचे हद्दीमधील खाजगी मिळकतीमधील
२६०० चौ. फुट अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.
पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र. ६ च्या वतीने बोपोडी परिसरातील विनापरवाना
अनधिकृत बांधकाम केलेल्या ५ मिळकतींवर कारवाई करुन २५० चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले.
बोपोडी परिसरातील मंत्री रिव्हेरा सोसायटी येथील विनापरवाना बांधकामावर दिलेल्या नोटीसांच्या अनुषंगाने
एमआरटीपी अॅक्ट कलम ४७८ (१)अन्वये नोटीस देऊन कारवाई करणेत आली. कारवाई अंतर्गत श्री. वर्गीस यांने ५०
चौ. फुट, सॅमयुअल सी एम यांचे ५० चौ. फुट, कौल यांचे ५० चौ. फुट, सुराल यांचे ५० चौ. फुट, जस्टीन राज यांचे
५० चौ फुट याप्रमाणे कारवाई करणेत आली.
सदर कारवाईमध्ये बांधकाम बांधकाम घरपाडी विभागाकडील बिगारी ७, पोलिस कर्मचारी १ गट, १ गॅस
कटर, १ जेसीबी इत्यादीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली.

