वाहतुकीस अडथळा ठरणाèया व्यावसायिकांवर कारवाई
पुणे महानगरपालिकेच्या बिबवेवाडी महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या वतीने बिबवेवाडी, धनकवडी परिसरातील सार्वजनिक रस्ते, चौक परिसरात वाहतुकीस अडथळा ठरणाèया पथारी, हातगाडीवाले व्यावसायिकांविरुध्द कारवाई करण्यात आली.
कारवाई अंतर्गत बालाजीनगर, त्रिमुर्ती चौक, दत्तनगर या परिसरातील वाहतुकीस अडथळा ठरणाèया १५ पथारी व ३० अन्य व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली.
सदर कारवाईत महापालिका सहाय्यक आयुक्त सुकुमार पाटील यांचे नियंत्रणा अंतर्गत पूर्ण करण्यात आली. कारवाईत विभागीय निरीक्षक श्री. कुंभार, निरीक्षक qशदे, खुडे, गायकवाड, भोसले, मुरगुंड, होनराव तसेच क्षेत्रिय कार्यालयाकडील अन्य कर्मचारी व अतिक्रमण विभागाचे पोलिस यांचे सहाय्याने कारवाई पूर्ण करण्यात आली.
अनधिकृत बांधकामावर कारवाई
पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र. ४ च्या वतीने कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेलमध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करणेत येऊन १५०० चौ. फुट क्षेत्र मोकळे करणेत आले.
संगमवाडी टीपीएस कोरेगाव पार्क लेन नं. ६ लगत बीट रुट हॉटेल टेरेसवरील ओqनग कच्चे व पक्के बांधकाम किचन १५०० फुट यावर कारवाई करणेत आली.
सदरची कारवाई १० पोलिस, १० बिगारी व १ गॅस कटर च्या सहाय्याने पूर्ण करणेत आली.
स्मार्ट सिटी अंतर्गत महत्वाचे क्षेत्राकरिता माहिती अर्जाद्वारे मतं नोंदविण्याचे आवाहन
स्मार्ट सिटी अंतर्गत पुणे शहरातील क्षेत्रनिहाय विकास सर्वेक्षणाचे कामकाज पुणे मनपाचे वतीने व
क्षेत्रिय कार्यालय स्तरावरुन नागरिकांकडून माहिती अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन भरुन घ्यावयाचे
कामकाज सुरु झाले असून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी दिनांक २६/१०/२०१५ पर्यंत
आपल्या आवडीच्या क्षेत्रनिहाय प्राधान्यक्रमास माहिती अर्जात पसंतीक्रम देऊन सहभाग नोंदवावा असे पुणे
महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. मनपाचे वतीने घरोघरी प्रतिनिधी येतील त्यावेळी
त्यांना सहकार्य करावे. तसेच ज्यांना ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे त्यांर्नी www.punesmartcity.in
वर संपर्क साधून माहिती अर्ज भरावा. www.punesmartcity.in सांकेतस्थळावर गेल्यानंतर क्षेत्र सर्वे बटन
दाबल्यानंतर माहिती प्राप्त होऊ शकेल.
नागरिकांकडून ज्या मुद्द्यांबाबत पसंतीक्रम माहिती अर्जात नमूद करावयाचा आहे या संदर्भात
सविस्तर माहितीकरिता अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) मा. ओमप्रकाश बकोरिया यांचे अध्यक्षतेखाली
मनपा मुख्य भवनातील महापालिका आयुक्त कार्यालय सभागृहात बैठक संपन्न झाली. नागरिकांकडून
माहिती अर्ज कशा पध्दतीने ऑनलाईन व ऑफलाईन भरावयाचे आहेत याबाबत खातेप्रमुख, महापालिका
सहाय्यक आयुक्त यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व अधिकाèयांनी आपले माहिती अर्ज
बैठकीप्रसंगी भरुन दिले.
याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) मा. ओमप्रकाश बकोरिया व उपायुक्त अनिल पवार
यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली. तसेच आशिष आगरवाल यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे
माहिती दिली.
स्मर्ट सिटी अभियान अंतर्गत क्षेत्रनिहाय विकास सर्वेक्षण कार्यक्रमा अंतर्गत नागरिकांनी सोमवार
दि. २६/१०/२०१५ पर्यंत माहिती अर्ज भरुन द्यावयाचे आहेत.
माहिती अर्जात नमूद केलेल्या १ ते ११ या परिसराचा अनुक्रमांक १ ते ६ या बाबींसमोरील चौकोनी
बॉक्समध्ये फक्त आवडीच्या क्षेत्राचा क्रमांक लिहावयाचा आहे. पसंतीक्रमानुसार क्रमांक लिहीणे
अपेक्षित आहे. तसेच वयोगट व नाव व मोबाईल क्रमांक माहिती अर्जात नमूद करावयाचा आहे.
याप्रसंगी शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पीएमपीएमएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मयुरा
qशदेकर, मुख्यलेखापाल श्रीमती उल्का कळसकर, अग्निशमन प्रमुख प्रशांत रणपिसे, उपायुक्त डॉ. उदय
टेकाळे, सहमहापालिका आयुक्त विलास कानडे, उपायुक्त माधव जगताप, उपायुक्त सुहास मापारी, उद्यान
अधिक्षक अशोक घोरपडे, अधिक्षक अभियंता राजेंद्र राऊत, नागवस्ती विकास प्रमुख हनुमंत नाझिरकर,
मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर, उपायुक्त मधुकांत गरड, कार्यकारी अभियंता नरेंद्र साळुंके,
महापालिका सहाय्यक आयुक्त जयंत भोसेकर, अशोक सकपाळ, युनुस पठाण, वसंत पाटील, विजय लांडगे,
संदीप कदम, रवी पवार, मंगेश दिघे, श्रीमती मनीषा शेकटकर, अनिरुध्द पावसकर, गणेश सोनुने व अन्य
अधिकारी उपस्थित होते.