पुणे- महापालिका आयुक्त कुणालकुमार यांनी आज राजकीय खेळीने आणि खुबीने स्मार्टसिटी प्रकल्पाला असलेला सारा राजकीय विरोध गुंडाळून ठेवल्याने या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांच्या नगरसेवकांची महापालिकेच्या खास सभेत मोठ्ठी कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले . या दबंगगीरीपुढे नांग्या टाकीत काहींनी पटकन रंग बदलत भाषणे केली तर काहींनी आपला सर्वाधिक रोष व्यक्त करीत का होईनात नांग्या टाकल्या .तर एका पक्षाचे सदस्य हे यावेळी नेत्यांच्या हातातील कठपुतली बनल्याचे चित्र सभागृहात दिसले .
दरम्यान आज सकाळपासून स्मार्टसिटी प्रकल्पाला होणारा विरोध आणि समर्थन सभागृहाबाहेर आणि सभागृहातही प्रगट होत होता पण आयुक्तांचा चेहरा मात्र आज ठाम विश्वासातच होता . सभा सुरु होण्यापूर्वी महापालिकेच्या प्रवेश द्वाराबाहेर पतितपावन संघटना स्मार्ट सिटी च्या समर्थनार्थ आणि पुणे शहर बचाव समिती स्मार्ट सिटी च्या विरोधात निदर्शने करीत होती
सकाळी अकरा वाजता सुरु होणारी सभा … वेळेत सुरु झालीच नाही या सभेला महापौर दत्ता धनकवडे हेच ११ वाजून २२ मिनिटांनी सभागृहात दाखल झाले . आणि त्यांनी प्रथम शेतकरी नेते शरद जोशी यांना आदरांजली वाहिली . यावेळी सभा कोणी बोलाविली ती कायदेशीर आहे काय ? अशा प्रश्नांचा भडीमार मनसे आणि कॉंग्रेसच्या सभासदांकडून होत असतानाच आयुक्तांनी थेट स्मार्ट सिटी बद्दल प्रेझेन्टेशन च्या नाव्वाने निवेदन सुरु केले . यावेळी नगरसेवकांनी कर्तव्यात काय कसूर केला कलम ४४८ प्रमाणे हि सभा का बोलाविली ? अशा प्रश्नांचा भडीमार झाला ज्यावर नगर सचिव सुनील पारखी यांनी कायदेशीर माहिती दिली पण आयुक्तांनी उत्तरे दिली नाहीत .
पूनावाला ग्रुपकडून १०० कोटीचे सहाय्य या प्रकल्पाला होणार असल्याचे सांगत कुणाल कुमार यांनी या प्रकल्पांतर्गत २४ तास पाणी पण मीटर पद्धतीने दिले जाईल,३५७ इ कचरा पेट्या होतील , १०० इलेक्ट्रिक बसेस येतील १०० इ रिक्षा घेण्यात येतील ज्यास इंधन लागणार नाही . मोबाईलवर बसेस ची माहिती उपलब्ध करून देणारे अप्प्स येतील. अशा योजन्माचा उल्लेख केला . एलपीजी सबसिडी सोडा अशा योजनांप्रमाणे पाणी पट्टीवरील सबसिडी सोडा अशी योजनाही असल्याचे सांगितले .५४ स्मार्ट बस थांबे जिथे वायफाय सुविधा असेल बसेस चार्ज करण्याची सुविधा असेल एल इ डी जाहिराती असतील अशा योजेनेची माहिती दिली पायी ५ मिनिटांच्या अंतरावर १ बाग ;अंधार किंवा उजेड पडला कि स्वयंचलित प्रकाशित होणारे पथ दिवे असतील ; ७४ सार्वजनिक शौचालये असतील अशी माहिती यावेळी दिली
१००० कोटी केंद्र -राज्य आणि महापालिका उदेणार असून अन्य ७०० कोटी केंद्राच्या योजनांमधून मिळू शकतील असेही ते म्हणाले . एसपीव्ही कंपनी या साऱ्याचा कारभार पाहिलं आणि या कंपनीत ६ राज्य शासनाचे ६ महापालिकांचे प्रतिनिधी असतील आणि ३ अधिकारी असतील स्मार्ट सिटी अंतर्गत औन्ध- बाणेर -बालेवाडी येथे महत्वपूर्ण योजना करण्यात येईल तिथे हि कंपनी कर गोळा करून तो पालिकेकडे जमा करेल असेही सांगितले.