महात्मा फुले मंडळाच्यावतीने माळी समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आले . बुधवार पेठमधील सावतामाळी भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष चांगदेव पिंगळे , उपाध्यक्ष मधुकर राऊत , सचिव सतीश भुजबळ , सहसचिव धोंडीबा भोंग , हिशोब तपासनीस हनुमंत टिळेकर ,संस्थापक सदस्य भगवानराव डोके , विश्वस्त मंडळ बाबुराव धायरकर , गुलाबराव रासकर , दिलीप करपे , पांडुरंग गाडेकर , अड. दिगंबर आल्हाट , सुधाकर आरु , विजय झगडे , बाळासाहेब बुणगे , अड. रंगनाथ ताठे , गिरीश झगडे व माळी समाजातील विद्यार्थी वर्ग ,पालक व समाजबांधव उपस्थित होते .
यावेळी डपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सांगितले कि , समाजाचे आराध्यदैवत संत सावतामाळी महाराज यांनी आपल्या कष्टाने शेती करून आपला मळा फुलविला आणि विठ्ठलाला आपल्या हृदयात घेतले , त्यांनी आपल्या कष्टातून देवाला आपल्याकडे आकर्षित केले , विद्यार्थ्यांनी देखील आपल्या कष्टातून पुढे आले पाहिजे , आणि समाजाला पुढे आणले पाहिजे