पुणे :
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित गांधी सप्ताहानिमित्त डॉ . कमलेश सोमण यांच्या ‘महात्मा गांधींची जडण -घडण ‘ या विषयावरील व्याख्यानाला आणि अक्षय सोमण यांच्या व्हायोलिन वादन, सुगम वाद्य संगीत कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला .
‘महात्मा गांधीजींचा प्रवास हा आत्मदर्शनाचा प्रवास आहे . त्यांच्या निर्लेपपणाने जगण्याचा अर्थ शोधता यायला हवा . गांधीजींचे कार्य हे परंपरा आणि नवता यांचे बेमालूम मिश्रण होते . यामध्येच त्यांच्या लोकप्रियतेचे आणि महानपणाचे गुण दडले आहेत . गांधीजिनच्या तत्त्वज्ञानाच्या आधारेच भारत जगाला दिशा दाखवू शकेल . ‘असे डॉ . कमलेश सोमण म्हणाले .
१९०६ आणि १९०७ ही वर्ष महात्मा गांधीजींच्या जीवनात कलाटणी देणारी ठरली. सत्याग्रहाचा जन्म याच वर्षांमध्ये झाला. महात्मा गांधीजींच्या आयुष्यात दक्षिण आफ्रिकेचा दौरा कलाटणी देणारा ठरला. तत्त्ववेत्ते रस्किन आणि टॉल्स्टॉय यांचा महात्मा गांधीवर खूप प्रभाव होता.
अक्षय सोमण यांच्या व्हायोलिन वादन, सुगम वाद्य संगीत कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला . त्यांनी शास्त्रीय ,सुगम वाद्य संगीत सादर केले . धनंजय पंडित यांनी तबल्यावर साथ सांगत केली .
हा कार्यक्रम ‘गांधी भवन’ कोथरूड येथे झाला. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी ,डॉ . उर्मिला सप्तर्षी ,संदीप बर्वे उपस्थित होते .

