महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने उपजिल्हाअधिकारी ज्योती कदम सन्मानित

Date:

1

 पुणे – जिल्ह्याच्या  उपजिल्हाअधिकारी  ज्योती कदम यांना राष्ट्रीय मतदार दिनी दिल्लीमध्ये भारतीय निर्वाचन आयोगकडून नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत पर्वती विधानसभा मतदार संघाचा  सर्वात कमी कालावधीत निकाल लावल्याबद्दल   त्यांना माजी राष्ट्रपती ए . पे. अब्दुल कलाम यांच्याहस्ते स्मृतीचिन्ह , प्रमाणपत्र आणि चाळीस हजार रुपये रोख रक्कमेचे पारितोषिक मिळाल्याबद्दल त्यांचा महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने राज्याचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाचारणे यांच्या हस्ते पुष्पगुछ देऊन सन्मानित करण्यात आले .

    यावेळी शिक्षण खाते कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल वाघमारे महसूल कर्मचारी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष दीपक चव्हाण , कोशाध्यक्ष संजय साखरे , शिवाजी खांडेकर , सतीश चांदेकर ,सुरेश मोकाशी नायब तहसीलदार राजेंद्र सिंदकर व अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .

    ज्योती कदम यांनी पर्वती विधानसभा मतदार संघाचा  सर्वात कमी कालावधीत निकाल १ तास ५० मिनिटांत लावला होता , त्यामुळे त्यांचा हा गौरव करण्यात आला . अशी माहिती  शिक्षण खाते कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी दिली . यावेळी पुणे  जिल्ह्याच्या  उपजिल्हाअधिकारी  ज्योती कदम यांनी या गौरवाबद्दल सांगितले कि , सर्वांच्या सांघिक कौशल्याने आम्ही हे यश प्राप्त केले आहे . त्यामुळे त्यांनी सर्वांचे आभार मानले . या पुढील काळात देखील कमीत कमी वेळेत निकाल लावण्याचा विक्रम करण्याचे त्यांनी सांगितले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून, अर्थसंकल्प ६ मार्च रोजी

मुंबई, दि. १० : राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय...

पुरंदर विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता;पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल

केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुणे, दि. १० फेब्रुवारी...

नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर वाडेकर,सभागृहनेते बिडकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

पुणे :विधान भवन, मुंबई येथे आज पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित...

प्रभाग ९ मधील मिसिंग लिंकबाबत चंद्रकांतदादा पाटील ॲक्शन मोडवर

आयुक्तांसोबत बैठक घेऊन मिसिंग लिंकच्या कामांना गती देण्याचे निर्देश ना....