टाकळीहाजी परिसरातील व महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे आराध्यदैवत असणार्या मळगंगादेवीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी आपण केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विकासनिधी आणण्यासाठी व परिसर विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे उमेदवार अरुण गिरे यांनी केले. टाकळीहाजी, माळवाडी, वडनेर, फाकटे, निमगाव दुडे आदी बेट भागातील गावांचा दौरा करत असताना ते बोलत होते.
टाकळीहाजी येथील आराध्यदैवत मळगंगादेवीच्या दर्शनानंतर त्यांनी आपल्या या भागातील दौर्याला सुरुवात केली. या वेळी बोलताना ते म्हणाले की, मळगंगादेवीचे तीर्थक्षेत्र एक आध्यात्मिक शांती देणारे तीर्थक्षेत्र आहे, तसेच येथील रांजणखळगे जगातील भू-शास्त्रज्ञांचे अभ्यासाचे मोठे ठिकाण आहे. हे ठिकाण जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे. हा आपला जागतिक वारसा आहे. येथे भाविकांना व पर्यटकांना उत्तम सुविधा मिळाल्या पाहिजेत. या कामासाठी खा. शिवाजीराव आढळराव-पाटील केंद्रात व राज्यात निधी मिळावा यासाठी प्रय▪करत आहेत. आपण सर्वांनी त्यांना ताकद मिळावी यासाठी माझ्यासारख्या शिवसेनेच्या धडपडणार्या कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहा, आपण सर्व मिळून या परिसराचा कायापालट करू, असे अरुण गिरे यांनी या वेळी सांगितले.