मुंबई –
इम्पाचे संचालक बाळासाहेब गोरे यांनी ५० निर्माते घेवून काल अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे मुंबईतील कार्यालय गाठले आणि महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांना घेरावो घातला . ४० हून अधिक चित्रपटांना अनुदानास अपात्र ठरविण्याची घटना पाटकर यांच्याच कारकिर्दीत घडल्याने हा घेरावो घालण्यात आला . यावेळी वर्षभरात गैरप्रकार, फसवणूकीने मराठी सिनेसृष्टी त्रस्त झाल्याचे गाऱ्हाणे मांडण्यात आले . वर्षभरात अध्यक्षांचे मात्र मोठ्ठ्या संख्येने चित्रपट झाले आणि पुण्या-मुंबईत पार्ट्याही झाल्या . त्यामुळे तुम्ही ‘मस्त ‘ आहात हो .. असा उपरोधिक शाब्दिक हल्लाही पाटकर यांच्यावर होतो आहे .
इम्पाचे निवडून आलेले सदस्य श्री बाळासाहेब गोरे तसेच दिलीप दळवी यांच्या पुढाकराने ५० च्या वर चित्रपट निर्माते व कलाकर्मी यांनी मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष यांना घेरावो घातला याबद्दल त्यांनी तत्पूर्वी सोशल मीडियातून जागृती करून इशारा देवून हा घेरावो घातला . चित्रपट अनुदान परिक्षण समितीने पाटकर यांच्या कारकिर्दीत ४० हून अधिक चित्रपट अनुदान करिता अपात्र ठरविले त्या बद्दल जाब विचारण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले . यावेळी ऊपस्थित निर्माते यांनी परिक्षक समिती बद्दल रोष व्यक्त केला. आणि खुद्द समितीचे सदस्य यांच्यासह पाटकर यांच्यावर यावेळी आरोप केले
परीक्षक समित्यांवर झालेल्या नेमणुका कशा होतात इथपासून ते काही शासनाचे पुरस्कार मिळालेल्या आणि पुरस्काराच्या स्पर्धेत दाखल झालेल्या चित्रपटांना देखील अनुदानास अपात्र कसे ठरविले ?अध्यक्ष म्हणून आपण चित्रपटाच्या स्क्रीनिन्गला का उपस्थित राहिला नाहीत असा भडीमार केला या प्रसंगी प्रामुख्याने सर्वश्री पंकज भट, अविनाश मोहीते, शिवाजी दोलतडे, रोमेल रॉड्रीक्स, नितीन चांदोरकर, युवराज पवार, अमोल गायकवाड, विवेक साहू, रामदास तांबे, किशोर विभांडीक, प्रकाश भालेकर, मुरली नल्लप्पा, विशाल सावंत, मानसिंग पवार, हेमंत साखरकर, नंदकुमार विचारे, रेखा पेंटर, डॉ. देवदत्त कापडीया, विजय भानू, राजु शेवाळे, आनंद ओरस्कर, दिनेश विसपुते, गणेश तळेकर, मोरे, राजेश दुर्गे, बाबासाहेब पाटील, प्रशांत राणे, महिमा मालेगांवकर, किरण
कुडाळकर, शरदचंद्र जाधव, अँड. मनिष व्हटकर, रणजित दरेकर, सचिन पाताडे, विजय वैद्य, नितीन जाधव, नंदू कुमावत, तसेच महामंडळाचे संचालक संजीव नाईक, अनिल निकम व अनेक चित्रकर्मी ऊपस्थित होते.चित्रपटांना अनुदान देताना ११ प्रकारच्या वर्गात १०० मार्क्स दिले जातात . कथा -संगीत -दिग्दर्शन – चित्रीकरण स्थळे , छायाचित्रण , संकलन आदींचा त्यात समावेश असतो. किमान ५० मार्क्स मिळविले तरच अनुदान दिले जाते मार्क्स ५० ते ७० असतील तर ३० लाख रुपये आणि ७१ च्या पुढे असतील तर ४० लाख रुपये अनुदान दिले जाते .यापोटी महामंडळ एक टक्का रक्कम निर्मात्याकडून घेते हि रक्कम रीतसर आहे असे म्हणतात याशिवाय हि महामंडळाच्या अन्य परवानग्यांसाठी महामंडळाची प्रचंड फी असतेच पाटकर यांच्या काळात गैरप्रकार, फसवणूक आणि भ्रष्टाचाराने मराठी सिनेसृष्टी त्रस्त झाल्याचे चित्र आहे .
महामंडळाच्या पाटकर यांच्या अध्यक्षपदाला सन्मानाने लोकमान्यता दिलेल्या क्षणी पुण्यात पाटकरांनी निर्मात्यांची कार्यशाळा घेवू , चित्रपट क्षेत्रातील फसवणूकिला आळा घालू , छोट्या कलावंतआणि पडद्यामागील कलाकार यांच्या समस्या सोडवू अशी आश्वासने दिली होती पण प्रत्यक्षात आपल्या वर्षभराच्या कारकिर्दीत त्यांनी चक्क सात सिनेमे केले त्यातच … तसेच फसवे मार्केटिंग आणि फसव्या प्रसिद्धीचे जाळे टाकून गब्बर झालेल्या पुण्यातील एका तथाकथीताच्या फार्म हाऊसवर आणि पुण्यातील हॉटेलात आराम करण्यातच त्यांचा वेळ गेला असावा असाही आरोप होतो आहे . दरम्यान या संदर्भात माहिती घेण्यासाठी महामंडळाच्या पुणे कार्यालयात आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता… येथील व्यवस्थापक आणि महामंडळ यांच्यात हिशेबावरून वादंग निर्माण झाल्याने आता येथे नव्याने व्यवस्थापक आले आहेत असे समजले . आणि आता रोख रकमेचा भरणा नाकारून केवळ धनादेश आणि डीडी नेच पैसे स्वीकारण्यात येतील असाही फलक येथे लावण्यात आला आहे . नव्या व्यवस्थापिकेला अर्ज देणे आणि चेक -डीडी घेणे यापलीकडे कशाचीही काहीही माहिती नसल्याचे ही सांगण्यात आले .