मुंबई : राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी मराठवाडा मुक्ति संग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
संपूर्ण देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरीही मराठवाड्यासह जुन्या हैदराबाद संस्थानातील लोकांना स्वातंत्र्यासाठी त्यानंतरही तब्बल 13 महीने 2 दिवस वाट पहावी लागली होती. त्यामुळे 17 सप्टेंबर हा दिवस जुन्या हैद्राबाद संस्थानाचा भाग असलेल्या व आता महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा राज्यात समाविष्ट असलेल्या क्षेत्रातील लोकांकरीता महत्त्वपूर्ण दिवस आहे. हैद्राबाद मुक्ती लढ्यात अनेक देशभक्त लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मराठवाड्यातील अनेक लोकांनी या लढ्याचे नेतृत्व केले होते. मुक्ती संग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहतो तसेच जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी संदेशात म्हटले आहे.