लोकप्रतिनिधींना काम करत असताना वारंवार गुन्हेगारांचा सामना करावा लागतो. प्रभागात तसेच शहरात विविध कामांसाठी फिरावे लागते. याप्रकरणाची दखल घेत पोलिसांनी शहरात कायदा व्यवस्था राखण्याच्या दृष्टीने गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा. भविष्यात होणाऱ्या हल्ल्याच्या शक्यतेने मनसेच्या नगरसेवकांच्या सहीनिशी दिलेल्या पत्रकात पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी मोरे यांनी केली आहे
मनसे नगरसेवक मोरे यांना हवे पोलिस संरक्षण
पुणे – शहरात पिस्तुल विक्री करताना पकडण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांकडून चौकशीदरम्यान शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांचा खून करण्याचा आरोपींचा बेत होता अशी माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित वसंत मोरे यांनी पोलीस आयुक्त सतीश माथुर यांच्याकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
शहरात पिस्तुलांची विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपींना गुन्हे शाखा युनिट १ ने केलेल्या कारवाईत स्वप्निल सुनील कुलकर्णी (वय २२, रा. साई पॅलेस, बालाजीनगर, धनकवडी), गणेश किरण खानापुरे (वय २६, रा. गुरूवार पेठ, मामलेदार कचेरीसमोर) आणि अविनाश मधुकर कदम (वय ४०, रा. २७६, गणेश पेठ आणि गुजरवाडी फाटा, कात्रज) यांना अटक करण्यात आली होती. आरोपींपैकी स्वप्निल सुनील कुलकर्णी आणि नगरसेवक वसंत मोरे यांच्यात वैमनस्य होते.
याआधीच्या एका घटनेत मोरे यांच्या भाच्याने अविनाश कदम याला एका कारणावरून मारहाण केली होती. त्यावेळी त्याचा पाय मोडला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेबरोबरच कुलकर्णी हा शहरात एका फ्लॅटचा बेकायदेशीररित्या ताबा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मोरे यांना मिळाली. त्यावेळी मोरे यांनी कुलकर्णीचा बेत हाणून पाडला होता. तेव्हापासून कुलकर्णी आणि कदम वसंत मोरे यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेऊन होते. आरोपींकडून शहरातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या खुनाचा बेत आखल्याची माहिती मिळल्यानंतर पोलिसांनी नगरसेवक वसंत मोरे यांना बोलावून सावध केले.