पुणे :-विविधरंगी आकारांमध्ये करण्यात आलेली आकर्षक पुष्परचना… फुलांचा
मनमोहक दरवळ… मनाला प्रसन्नता प्रदान करणाऱ्या गुलाबापासून ते
अॅस्टरपर्यंत मांडण्यात आलेल्या फुलांनी रसिकांची मने अक्षरश: फुलून गेली
होती. निमित्त होते ज्योती कुलकर्णी रिसर्च फाउंडेशनतर्फे भरवण्यात आलेल्या
पुष्परचना प्रदर्शनाचे. .गुलाब, ऑर्किड, जरबेरा, लास्पर, शेवंती, आदी फुलांचा तसेच
लिलीची पाने, सायकस, केवडा यांची अचूक सांगड घालून केलील्या
मनमोहक कलाकृती पाहण्यास सर्वांनी एकच गर्दी केली.
या स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन पुष्परचना सादर केल्या. सरोज
जोशी आणि शीला वाघोलीकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेतील पुष्परचना
पाहण्याची सर्वांनी संधी मिळावी यासाठी स्पर्धेनंतर लगेचच प्रदर्शनही भरवण्यात
आले. ज्योती कुलकर्णी रिसर्च फाउंडेशनच्या विश्वस्त सौ. अश्विनी देशपांडे, सौ.
भाग्यश्री कुलकर्णी व सौ. तन्वी कुलकर्णीयादेखील उपस्थित होत्या.डॉ. चारुलता
बापये यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.यावेळी त्यांनी प्रत्येक स्पर्धकाकडून
आपल्या आपल्या पुष्परचनेमागची संकल्पना समजून घेण्यावर भर दिला.
डॉ. चारुलता बापये यावेळी म्हणाल्या, महिलांनी आपल्या कल्पकतेतून या
दर्जेदार कलाकृती केल्या आहेत ,याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. पुष्परचना
दिसायला सोपी वाटते परंतु यात अनेक बारकावे असतात ते समजून घेवून
त्याकडे छंद म्हणून पाहण्यापलीकडे जाऊन या क्षेत्राचे व्यावसायिक दुष्टीकोनातून
वाढलेले महत्व लक्षात घेऊन त्यासाठी स्वत:ला अधिकाधिक तयार करणे गरजेचे
आहे.
कला सादर करताना मिळणारा आनंद महत्वाचा त्यातून आपण काय शिकलो
आणि कुठे कमी पडलो हे जाणून घेणे म्हणजेच खर्या अर्थाने प्रगती करणे
आहे. पुष्परचना करताना मिळाला आनंद हा पुरस्कारापेक्षा कितीतरीपट प्रेरणा
देणारा असतो. अशी भावना परिक्षक सरोज यांनी व्यक्त केली.
ज्योती कुलकर्णी यांनी समाजातील इतर महिलांसाठी विविध संधी देण्यासाठी
त्यांनी परिश्रम घेतले होते. त्यांचा कार्याला पुढे नेण्यासाठी आम्ही ह्या फौंडेशनची
स्थापना केली आहे.दैनंदिन आयुष्यातून आपल्या छंदासाठी एक व्यासपीठ
मिळावे या उद्देशाने खास महिलांसाठी हा खास उपक्रम राबविला होता. अशी
भावना सौ. भाग्यश्री कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केली. त्यापुढे
म्हणाल्या ज्योती कुलकर्णी रिसर्च फाऊंडेशनतर्फे कृषी, उद्योग, पर्यावरण या
क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करणा-या महिलांनाही २७ ऑक्टोबरला पुरस्कार देऊन
सन्मानित करण्यात येणार आहे. स्त्रियांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी घेण्यात
आलेल्या ज्योती फुलराणी या स्पर्धेतील विजेत्या महिलांनाही त्याच
दिवशी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत .
कल्पना कृतीत उतरवल्याशिवाय त्याला परिपूर्णता मिळत नाही त्यामुळेच प्रत्येक
स्त्रीने आपल्यातील कलागुणांना ओळखून त्या जोपासून स्वत:चे अस्तित्व
निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे असा मोलाचा सल्ला यावेळी सौ. तन्वी
कुलकर्णी यांनी दिला. सूत्र संचालन सौ. दीपाली जोशी यांनी केले.