पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी वृक्षरोपण व वृक्षसंवर्धानाचे आवाहन केले आहे,त्यास अनुसरुन पुणे महानगरपालिकेच्या इमारती असलेल्या सर्व 136 शाळानमधे वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेणार असुन त्याची सुरुवात कोथरुड पासुन करत आहे असे शिक्षण मंड्ळ सदस्य सौ.मंजुश्री खर्डेकर यानी सांगितले
.मनपा च्या ज्या ज्या शाळान्मधे मैदाने आहेत व जेथे मोकळी जागा उपलब्ध आहे तेथे व्रुक्ष लागवड करण्यात येइल असे ही त्या म्हणाल्या.पौड फाट्यावरील पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेत व्रुक्षारोपणाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.सम्राट अशोक विध्यालया पाठोपाठ दीनदयाळ विध्यालयात आयोजित कार्यक्रमात विध्यार्थी,पालक व रिक्षेवाले काकांच्या हस्ते रोप लागवड करण्यात आली.मनपाच्या उधान विभागाचे कर्मचारी ही यावेळी उपस्थित होते.मोठ्या प्रमाणावर व्रुक्षांची कत्तल होत असल्याने पर्यावरणाची हानी होत असुन मुलानी व्रुक्ष लागवड व संवर्धनाचे महत्व समजुन घ्यावे व आज लावलेल्या रोपांची निगा राखावी असे ही सौ.खर्डेकर म्हणाल्या.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका एलिझाबेथ काकडे,क्रीडा शिक्षक बहिरामे सर,शाळा समिती च्या सदस्या सौ.गौरी करंजकर,राज तांबोळी,निलेश गरुडकर,भारत कदम,पोपट बालवडकर,सुधीर फाटक,सुमीत दिकोंडा,जयेश सरनौबत,रामदास गावडे,श्रीक्रुष्ण गोगावले,जगदीश देडगे व इतर मान्यवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.