मुंबई-
मध्यरात्रीनंतर च्या ट्विट्वरील ‘ सलमान उवाच’ ने देशभर याकुब च्या फाशीबाबत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत गदारोळ उडविला. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या फाशीला अभिनेता सलमान खानने विरोध केला आहे. सलमानने याकूबच्या बचावासाठी तब्बल १४ ट्विट्स केले असून टायगर मेमनच्या गुन्ह्यासाठी त्याचा भाऊ याकूबला फाशी कशासाठी?, असा थेट सवाल करत त्याने न्यायव्यवस्थेलाच आव्हान दिले.
सलमानने रात्री १ वाजून ५२ मिनिटांनी ‘टायगरला फासावर लटकवा’, असा ट्विट केला. त्यानंतर २ वाजून ४१ मिनिटांपर्यंत एकामागून एक ट्विटची मालिका सलमानने सुरु ठेवली
दरम्यान सलमान उवाच ऑन ट्विट च्या बातम्या देशभर गाजत असताना एकीकडे माध्यमांनी त्यावर झोड उठविली तर साताऱ्यात सलमानच्या पोस्टर ला काळे फासण्यात आले आणि सलमानचे वडील सलीम खान यांनी सलमान ची हि बकवास असल्याचे म्हटले असताना दुसरीकडे अभिनेता सलमान खाननं ट्विट केल्यानंतर बॉलिवूड व राजकारणातील ४० दिग्गजांनी स्वत:च्या स्वाक्षरीचं एक पत्रच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना लिहिलं असून, याकूब मेमनची फाशी रद्द करण्याची मागणी केली आहे.
याकूबची फाशी रद्द करा, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. निर्माते महेश भट्ट, अभिनेते नसिरुद्दीन शहा, भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा, ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी, माकप नेते सीताराम येचुरी, प्रकाश करात, वृंदा करात यांच्यासह ४० मान्यवरांच्या या पत्रावर स्वाक्षऱ्या आहेत.
१९९३च्या बॉम्बस्फोटात याकूब मेमनचा सहभाग सिद्ध होऊन त्याला सर्वोच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. राष्ट्रपतींनी त्याचा दयेचा अर्जही फेटाळला असून महाराष्ट्र सरकारने याकूबच्या फाशीची तारीखही निश्चित केल्याचं समजतं. याकूबचे परतीचे सर्व कायदेशीर दोर कापले गेले असताना ‘भाईजान’ सलमानच्या टविटमुळं भावनांचं राजकारण रंगलं आहे.

‘सलमान खानने आपली ट्विट्स मागे घेणं अपेक्षित- न्यायमूर्ती पी.डी कोदे
याकूब मेमनच्या समर्थनात अभिनेता सलमान खानने केलेले ट्विट हे त्याचं वैयक्तिक मत आहे. आणि घटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. ‘माहिती असताना किंवा नसताना विविध विषयांवर मत मांडण्याची काहींना सवय असते’, पण सलमानच्या ट्विटचा याच्याशी काय संबंध आहे? हा प्रश्न इथे उपस्थित होतो, असं मुंबईतील १९९३ बॉम्बस्फोट मालिकेची सुनावणी करणारे न्यायमूर्ती पी.डी कोदे यांनी सांगितलं. तसंच ‘सलमान खानने आपली ट्विट्स मागे घेणं अपेक्षित आहे असं कोदेंनी सांगितलं.
‘याकूबच्या फाशीप्रकरणी माहिती असूनही जे विरोधी मत व्यक्त करत आहेत त्यांचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. पण ज्यांना काही माहितचं नाही आणि ते मत मांडताहेत त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. असेही ते म्हणाले

‘सलमाननं केलेली ट्विट्स अर्थहीन व बकवास -सलीम खान
याकूब मेमनच्या फाशीविरोधातील ट्विटमुळं टीकेच्या ‘रडार’वर आलेल्या सलमानला वाचवण्यासाठी त्याचे वडील निर्माते-दिग्दर्शक सलीम खान ‘सलमाननं केलेली ट्विट्स अर्थहीन व बकवास पुढं आले आहेत. ‘सलमाननं केलेली ट्विट्स अर्थहीन व बकवास आहेत. त्याकडं दुर्लक्ष करा,’ असं आवाहन सलीम खान यांनी केलं आहे.
सलमाननं चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं आहे. त्यानं असे टविट्स करायला नको होते. त्याच्या वक्तव्यांना फार महत्त्व देऊ नका,’ असं सलीम यांनी म्हटलं आहे.
याकूबला फाशी नको!
सलीम यांनी सलमानचा बचाव केला असला तरी याकूबला फाशी होऊ नये असंच त्यांचंही मत आहे. ‘याकूबला फाशी देण्याऐवजी त्याला तुरुंगातच ठेवलं पाहिजे. त्याला आयुष्यभर तुरुंगात बंद ठेवणं ही त्याच्यासाठी फाशीपेक्षाही मोठी शिक्षा असेल,’ असं सलीम यांनी म्हटलं आहे.
विशेष सरकारी वकील उज्वल निकम , तसेच भाजपचे एकनाथ खडसे ,आणि रामदेवबाबा यांनी हि सलमान उवाच ला आक्षेप घेत माध्यमांकडे प्रतिक्रिया नोंदविल्या याकूब मेमनला आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलेलं आहे त्यामुळेच या निकालावर जर सलमान खानने मतप्रदर्शन केलं असेल तो न्यायालयाचा अवमान ठरतो, अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.
अभिनेता सलमान खानने याकूब मेमनच्या फाशीला विरोध करण्यासाठी तब्बल १४ ट्विट्स केली आहेत. त्यात याकूब निष्पाप आहे आणि टायगर मेमनच्या गुन्ह्याची शिक्षा त्याला भोगावी लागत आहे, असा दावा सलमानने केला आहे. सलमानच्या या ट्विट्सवर प्रतिक्रिया देताना निकम यांनी सलमानने हे ट्विट्स तत्काळ मागे घ्यायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.







