पुणे -पर्वती मतदार संघात मध्यमवर्गीय मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून‘म्हाडा’च्या माध्यमातून मध्यमवर्गीयांना स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नकरूअ से पर्वती मतदारसंघाचे कॉंग्रेसचे उमेदवार अॅड. अभय छाजेड यांनी सांगितले
अभय छाजेड यांनी आज सकाळपासून वैयक्तिक व पद्यात्रेद्वारे मतदारांशी संपर्कसाधला. सकाळी महादेवनगर भागातील झोपडपट्टीमध्ये जावून त्यांनी तेथील नागिरकांच्या समस्या जाणून घेतल्या. या भागातील रहिवाशांवर अन्याय न होता येथील ‘बीडीपी’ मधील बांधकामाचा प्रश्न आपण मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी दिले त्यांच्यासमवेत माजी महापौर प्रसन्न जगताप, आबा जगताप, अवधूत मते व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यानंतरमाजी नगरसेवक शंकर पवार यांच्या कार्यालयापासून छाजेड यांच्या पदयात्रेला प्रारंभ झाला सिंहगड रस्ता बिग बझार ते सई नगर,सरिता नागरी फ़ेज२, सरिता विहार , नवश्या मारुतीचौक, समता नगर, गणपती नगर, गणेश मळा चौक, सिरता नागरी फ़ेज१, दत्तवाडी रस्ता,रक्षालेखा सोसायटी, दत्तवाडी, म्हसोबा चौक, लडकतवाडी रस्ता, भंडारी हॉटेल,सिंहगडरस्ता, स्टेट बँक कॉलनी असा मार्गक्रमण करीत पानमळा येथे पदयात्रा समाप्त झाली.
दत्तवाडी मधील पूरग्रस्तांच्या घराच्या मालकीचा प्रश्न मार्गी लागला असला तरी वाढीव बांधकामाचा प्रश्न अजून शिल्लक आहे तो मार्गी लावण्यासाठी आपण कटीबद्ध असूअसे छाजेड यांनी सांगितले . तसेच या भागात मध्यमवर्गीय मतदारांची संख्या मोठ्याप्रमाणात असून त्यांना परवडणाऱ्या किंमतीत घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाच्यामार्फत जमीन व बांधकाम व्यावसाियकांना वाढीव एफएसआय मिळवून देण्यासाठी आपण
प्रयत्न करूअसे छाजेड यांनी सांगितले . पदयात्रेमध्ये त्यांच्यासमवेत महाराष्ट्रप्रदेश कॉंग्रेस किमटीच्या सिचव प्रा. मनीषा पाटील, शंकर पवार , शिव मंत्री , सिचनआडेकर, तुकाराम पवार, सुधीर काळे,वैशाली अरुण धिमधिमे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व महिला सहभागी झाल्या होत्या. पुणे शहर भीमशक्तीचे उपाध्यक्षवि जय ओहाळ व पुणे शहर सरचटणीस प्रज्ञावंत गायकवाड यांनी अभय छाजेड यांना पाठींबा देवून ते आजच्या पदयात्रेत सहभागी झाले होते.
मध्यमवर्गीयांसाठी स्वस्तात घरे योजना राबविणार – अभय छाजेड
Date: