शिवसेना-भाजप महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्यामुळे राज्यात पंचरंगी लढती होणार असून या परिस्थितीत शिवसेना – भाजप – मनसे यांच्या मतांमधील विभाजन होणार असल्याचे मत मांडण्यात येत आहे यात आघाडी आणि महायुती तुटल्याचा राजकीय तोटा शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांना सर्वाधिक सहन करावा लागणार आहे. असा दावा करण्यात येतो आहे कॉंग्रेसचा परंपरागत मतदार राज्यात आता ठामपणे काँग्रेस च्या पाठीशी उभा राहतो काय ? हा हि प्रश्न निर्माण झाला आहे एकंदरीतच मत विभाजनाने गोंधळ कि कोणा एकालाच प्रचंड बहुमत ? हा सवाल आता अनेकांना त्रस्त करतो आहे , मतदार राजाच्या हातीच आता महाराष्ट्राचे भवितव्य आहे .
गेल्या २५ वर्षांत शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष युती म्हणून लढत असल्यामुळे परस्परांच्या विरोधात उमेदवार उभे केले जात नव्हते. जेथे सेनेचा उमेदवार असे तेथील भाजपचे कार्यकर्ते हे शेजारच्या भाजपचा उमेदवार असलेल्या मतदारसंघात प्रचाराचे काम करीत. तसेच सेनेच्या बाबतीतही असे. परंतु सेनेकडे मुंबई, मराठवाड्यात संघटनात्मक जाळे असल्यामुळे त्याचा फायदा भाजपच्या उमेदवारांना होत असे. आता शिवसेना व भाजपला परस्परांविरोधात लढायचे आहे. त्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावरच महायुती तुटल्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचाही गोंधळ उडाला आहे.
शिवसेना-भाजप युती असती तर मुंबईत २५च्या आसपास जागा निवडून आल्या असत्या. परंतु आता शिवसेनेचा उमेदवार असेल तेथे भाजपचा उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे युतीच्या मतांचे विभाजन होईल. त्यात काँग्रेसच्या उमेदवारांचा काही मतदारसंघांत फायदा होईल, अशी भीती आता दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना वाटत आहे. मुंबईत काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीची ताकद नगण्य आहे. त्यामुळे आघाडी तुटली तरी मुंबईत काँग्रेसला फटका बसणार नाही. मात्र काँग्रेसबरोबरची आघाडी तुटल्यामुळे मुस्लिम, दलित आणि उत्तर भारतीय मतांचा फटका मुंबईतील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसेल की काय, अशी राष्ट्रवादी उमेदवारांना शंका आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार रिंगणात असल्याने हा धोका आहे.
मत विभाजनाने गोंधळ कि कोणा एकालाच प्रचंड बहुमत ?
Date: