पुणे- भारतीय जनता पार्टी पुणे शहरच्यावतीने अखिल मंगळवार पेठ येथे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांच्याहस्ते सन २०१६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले . या दिनदर्शिकेची निर्मिती भारतीय जनता पार्टी ओ बी सी आघाडी पुणे शहर सरचिटणीस सतीश गायकवाड यांनी केली आहे .
या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी पुणे शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर ,माजी नगरसेवक दिलीप उंबरकर ,बांधकाम व्यावसयिक शरदप्रकाश अडोकिया , माजी नगरसेवक मनीष साळुंके , पतित पावन संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष राजाभाऊ पाटील , गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे सरचिटणीस चरणजितसिंग सहानी , जयप्रकाश पुरोहित , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष निलेशभाऊ आल्हाट , उध्वव मराठे , अशोक खंडागळे , दिनेश सामल , अमित चव्हाण , उमेश शिंदे , पवितसिंग सहानी , गोरख घोडके , युसुफ शेख , दत्ता पोळ , गोरख दुपारगुडे , कैलास पिसाळ , प्रताप सावंत , विशाल दरेकर , भिकन सुपेकर , सुरेश दरेकर , धनेश साबळे , शंतनू जावळे आदी मान्यवर उपस्थित होते .
या दिनदर्शिका रंगीत बारा पाणी असून सुमारे पाच हजार प्रती छापण्यात आलेले आहे . या दिनदर्शिका अखिल मंगळवार पेठ , सोमवार पेठ , रास्ता पेठ येथे वाटप करण्यात येणार आहे . अशी माहिती दिनदर्शिकेची निर्मितीकार भारतीय जनता पार्टी ओ बी सी आघाडी पुणे शहर सरचिटणीस सतीश गायकवाड यांनी दिली .
यावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले कि , सतीश गायकवाड यांचे कार्य कौतुकास्पद आहे . सर्वाना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता आहे . त्यांचा प्रत्येक क्षेत्रात जनसंपर्क दांडगा आहे
या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत सतीश गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन जयप्रकाश पुरोहित यांनी केले तर आभार उध्वव मराठे यांनी मानले .