पुणे, : भोसरी एमआयडीसीमधील शिरभाते इंडस्ट्रीजमध्ये 79,396 युनिटची म्हणजे 10 लाख 39 हजार 60 रुपयांची वीजचोरी महावितरणने उघडकीस आणली आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, की भोसरी एमआयडीसीमध्ये प्लॉट क्र. 232, सेक्टर 7 मधील मेसर्स शिरभाते इंडस्ट्रीजमधील वीजवापराबाबत संशय निर्माण झाल्याने महावितरणच्या अभियंत्यांनी वीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी केली. प्राथमिक तपासणीत फेरफार केल्याचे दिसून आल्यानंतर वीजमीटर व सीटी यंत्रणा (करंट ट्रान्सफार्मर) पंचनामा करून जप्त करण्यात आले. त्यानंतर पुढील तपासणीत वीजमीटर व सीटी यंत्रणेत वीजचोरीसाठी हेतूपुरस्सर तांत्रिक फेरफार केल्याचे आढळून आले. यात 79,396 युनिटची म्हणजे 10 लाख 39 हजार 60 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले.
मेसर्स शिरभाते इंडस्ट्रीजमधील वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या नेतृत्वात अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, श्री. रमेश मलामे, कार्यकारी अभियंता श्री. धर्मराज पेठकर, श्री. प्रवीण नाईक, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. प्रदीप गिरी, उपकार्यकारी अभियंता श्री. एस. एस. हातोळकर, सहाय्यक अभियंता रमेश सुळ, शितल बोथे, तंत्रज्ञ कृष्णा गायकवाड, विष्णू भूजबळ योगदान दिले.
या वीजचोरीप्रकरणी मेसर्स शिरभाते इंडस्ट्रीजच्या जागेचे मालक सुनील येडे, वीजवापरकर्ते जाकीर शेख, शशिकांत प्रकाश निकम, इरफान शेख, फुलचंद रामदुलार विश्वकर्मा आदी सहा जणांविरुद्ध बुधवारी (दि. 2) रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135, 138 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.


