पुणे, ता. 27 : ‘ऐलमा पैलमा गणेश देवा…’, ‘श्रीकांता कमल कांता….’, ‘कार्ल्याचा वेल लाव सुने…..’ अशा वर्षानुवर्षे चालत आलेल्या भोंडल्याच्या गाण्यांवर फेर धरताना ‘निवारा’ वृध्दाश्रमातील निराधार महिला रंगून गेल्या होत्या. निमित्त होत सुयोग मित्र मंडळ व चतु:शृंगी देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या ‘आजीबाईंचा भोंडला’ या कार्यक्रमाचे. लहानपणच्या आठवणींच्या स्मरणरंजनात त्या हेलावून गेल्या होत्या. त्यांनी फुगडया घातल्या आणि झिम्मा खेळण्याचा आनंदही लुटला. देवीच्या दर्शनानंतर त्यांच्या चेहऱ्यावर कृतार्थतेची भावना होती. अपर्णा अनगळ, दीपा सुपेकर, अश्विनी आदवडे, पल्लवी शर्मा यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
भोंडल्यात रंगल्या ‘आजीबाई’
Date: