मुंबई,
छगन भुजबळांच्या पाठीशी खरोखर राष्ट्रवादी पक्ष आहे काय असा सवाल आता उपस्थित होतो आहे , शरद पवार सारख्या नेत्यांनी भुजबळ प्रकरणी मौन राखणे हे काही कोणाला पटणारे आणि मानवणारे नसल्याने कारवाई संदर्भात शरद पवारच संशयाच्या भोवऱ्या त राजकीय दृष्टीने सापडणार आहेत आर आर आबा गेल्यानंतर भुजबळ हे पक्षाचे ज्येष्ठ नेते होते . होणाऱ्या कारवाईचा गंध हि पवारांना नसेल असे कोणी मानायला तयार होत नाहीत . भुजबळांची कॉलर धरण्यापूर्वी नक्कीच वरच्या स्तरावरून काही गोपनीय गोष्टी घडल्या असाव्यात अशी भावना पसरते आहे
भुजबळ यांच्या मुंबई ठाणे, पुणे व नाशिकमधील तब्बल १९ मालमत्तांवर छापे टाकण्यात आले व या शक्तिशाली नेत्याच्या कुटुंबीयांचे ज्ञात ‘धनबळ’ समोर आले. पण तुर्तास या मोहिमेचे यश तेवढ्यावरच मर्यादित राहिले असून, पथकाला घोटाळ्यांशी संबंधति एकही कागद मिळालेला नाही.या वर काळ पत्रकारांनी भुजबळ यांच्या विषयी शरद पवार यांना जाहीर पणे प्रश्न करूनही ‘मी क्रिकेट सोडून कोणत्याही विषयावर बोलणार नाही ‘ असे स्पष्ट केल्याने पत्रकारांच्याही मनात संशयाची पाल चूक चुकल्या शिवाय राहिली नाही तर दुसरीकडे मधुकर पिचड आणि नवाब मलिक मात्र भुजबळ यांच्या पाठीशी पक्ष ठाम असल्याचे वाहिन्या आणि पत्रकारांना सांगत होते . हि बाब अचंबित करणारीच होती
दरम्यान , महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी अनेकदा सरकारे बदलली, मात्र ज्या पद्धतीने मला व माझ्या कुटुंबाला देवेंद्र फडणवीस सरकारकडून टार्गेट केले जात आहे, तसे यापूर्वी कधीही घडले नव्हते. मला व माझ्या कुटुंबाला गाडून टाकण्याचा प्रयत्न करू नका, अशी उद्विग्न प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी कारवाईसंदर्भात व्यक्त केली.
ज्या प्रकरणांबात माझ्या विरोधात गुन्हे नोंदविले जात आहेत, ते निर्णय तत्कालीन मंत्रिमंडळाच्या उपसमितीने घेतले होते. ज्याचे अध्यक्ष तत्कालीन मुख्यमंत्री होते. या प्रकरणांमध्ये जर मी गुन्हेगार असेन तर त्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला जे उपस्थित होते ते सर्वजण गुन्हेगार आहेत, असे भुजबळ म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ही सर्व कारवाई कोर्टाच्या निर्देशानुसार सुरू असल्याचे म्हटले आहे. त्यावर बोलताना, कोर्टाने या प्रकरणांमध्ये चौकशी करण्याचे आदेश दिले होते. माझ्यावर वा माझ्या कुटुंबीयांवर एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले नव्हते, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि कलिना येथील मध्यवर्ती ग्रंथालयाच्या उभारणीत असलेल्या अनियमिततांची चौकशी एसीबी करत असून, त्यातील आरोपींच्या निवासस्थानांची शनिवारपासून झडती सुरू झाली आहे. यात राज्याचे माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांच्यासह सार्वजनकि बांधकाम विभागांच्या अनेक अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या घोटाळ्यात जात्यात असलेले तत्कालीन सार्वजनकि बांधकाममंत्री छगन भुजबळ, त्यांचे पुत्र पंकज, पुतण्या समीर यांच्या मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक येथील मालमत्तांवरही मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास एसीबीने छापे घातले. यामध्ये १०० अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. या छाप्यांमध्ये भुजबळ कुटुंबीयांच्या नावे चारही शहरांत असलेल्या स्थावर मालमत्तांचा तपशील उघड झाला. मात्र छाप्यांमध्ये अधिकाऱ्यांना दोन्ही घोटाळ्यांशी संबंधति एकही कागदपत्र अथवा पुरावा सापडलेला नाही. बेहशिेबी संपत्ती, पैसे यांची मोजणी करण्यासाठी सर्व साहित्य घेऊन ैकर्मचारी या मालमत्तांवर धडकले होते, परंतु, ज्ञात मालमत्तेपलीकडे एसीबीला भुजबळ कुटुंबीयांच्या नावे काहीही सापडलेले नसल्याचे समजते.

तर ही कारवाई आकसाने केलेली नाही. यामध्ये राज्य सरकारचा हस्तक्षेप नाही. अँटी करप्शन विभागासमोर जे पुरावे आणण्यात आले, त्यानुसारच कारवाई सुरू आहे आणि यापुढेही अशा प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात येईल. आगे आगे देखिये होता है क्या!असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे