Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

भारत बनेल सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश …. मात्र वर्चस्व राहील हिंदूंचेच …वॉशिंग्टन प्यू रिचर्स सेंटर चा अहवाल

Date:

वॉशिंग्टन – जगाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत इ.स. 2050 पर्यंत हिंदूंची लोकसंख्या तिसऱ्या क्रमांकावर असेल, तर भारत हा सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला जगातील पहिलाच देश ठरेल, अशी माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे.
प्यू रिचर्स सेंटरने जगातील धार्मिक लोकसंख्येचा अभ्यास केला. या अभ्यासाचा अहवाल गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आले. भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या वाढण्याचा आजचा सुस्साट वेग पाहता, २०५० पर्यंत जगातील सर्वाधिक मुस्लिम इंडोनेशियाऐवजी भारतात असतील, अशी आकडेवारी या  जागतिक सर्वेक्षणातून समोर आली आहे. अर्थात, मुस्लिमांची संख्या ‘सुपरफास्ट’ वाढली, तरी भारतात हिंदू धर्मियांचंच वर्चस्व राहील, आणखी ३५ वर्षांनीही देशात हिंदूंचीच लोकसंख्या मुस्लिमांपेक्षा जास्त असेल, असंही त्यात नमूद करण्यात आलंय.
२०५० पर्यंत हिंदूंची लोकसंख्या जगात तिसऱ्या क्रमांकांवर येईल, जगात १.४ अब्ज म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या १४.९ टक्के हिंदू असतील. ख्रिश्चन धर्म ३१ टक्के (२.९ अब्ज) लोकसंख्येसह जगातील सर्वात मोठा धर्म असेल, तर मुस्लिमांची लोकसंख्या त्यांच्यापेक्षा फक्त एक टक्क्यानं कमी, म्हणजेच २.८ अब्ज इतकी असेल, असा अंदाज प्यू अभ्यास केंद्राच्या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे.
जगातील सर्वाधिक मुस्लिम आज इंडोनेशियात आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार तिथे मुस्लिमांची संख्या २०२.९ दशलक्ष इतकी आहे. पाकिस्तानात २०१०च्या गणनेनुसार १७ कोटी ८० लाख ९७ हजार मुस्लिम लोकसंख्या आहे, तर भारतात सुमारे १७ कोटी ६० लाख मुस्लिम राहतात. परंतु, देशात मुस्लिमांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं पुढच्या ३५ वर्षांत, इंडोनेशियापेक्षा जास्त मुस्लिम भारतात असतील, असं सर्वेक्षणात म्हटलंय. देशातील हिंदुत्ववादी संघटनांना त्यामुळे आयता मुद्दाच मिळालाय. हिंदूंची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे सल्ले देणारी मंडळी आता अधिक सक्रिय होऊ शकतात. परंतु, २०५० मध्येही भारत हे हिंदूबहुल राष्ट्रच असेल, असं याच संशोधकांनी आश्वस्त केलं आहे. उलट, आज जगात चौथ्या क्रमांकावर असलेला हिंदू धर्म तिसऱ्या क्रमांकावर येईल, असं गणित त्यांनी मांडलंय.
आज कुठलाच धर्म न मानणाऱ्यांची संख्या हिंदू धर्मियांपेक्षा जास्त आहे. म्हणजेच, ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्मियांनंतर त्यांचा क्रमांक लागलो. पण, पुढच्या काही वर्षांत हिंदू धर्मीय त्यांना मागे टाकू शकतात. बौद्ध धर्मियांच्या लोकसंख्यावाढीचा दर कमी असल्यानं त्यांची संख्या फार वाढणार नाही, असंही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आलंय.
इस्लाम मानणाऱ्यांची संख्या जगभरात तुफान वाढतेय, हे या सर्वेक्षणातून अधोरेखित झालंय. २०१० मध्ये जगात २.१७ अब्ज ख्रिस्ती धर्मीय होते आणि मुस्लिमांची संख्या १.६ अब्ज होती. पण, हे अंतर झपाट्यानं कमी होत चाललंय. लोकसंख्यावाढीचा आजचा ट्रेंड कायम राहिल्यास २०७० मध्ये ख्रिस्ती धर्माला मागे टाकून मुस्लिम धर्म जगातील सर्वात मोठा धर्म ठरेल, असा तर्कही सर्वेक्षणात बांधला आहे.

यानुसार इ.स. 2050 पर्यंत जगातील हिंदूंच्या लोकसंख्येत 34 टक्‍यांपर्यंत वाढ होण्याची शक्‍यता आहे. तसेच जगातील एकूण लोकसंख्येपैकी 14.9 टक्के हिंदू लोकसंख्या असेल. कोणत्याही धर्माशी संबंधित नसणाऱ्या 13.2 टक्के लोकसंख्येला मागे टाकून हिंदूंची लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत तिसऱ्या क्रमांकावर पोचेल, असेही या अहवालात म्हटले आहे. मुस्लिम धर्मियांच्या लोकसंख्यावाढीचा वेग हा जगात सर्वाधिक असेल. तर भारतामध्ये हिंदूंची सर्वाधिक लोकसंख्या असेल. तसेच इतर कोणत्याही राष्ट्राच्या तुलनेत भारतामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या सर्वाधिक असेल. सध्या जगात ख्रिश्‍चनांची लोकसंख्या सर्वाधिक असून इतर कोणत्याही मोठ्या धर्मापेक्षा मुस्लिमांची वाढ वेगाने होत आहे. मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा वेग कायम राहिला तर इ.स. 2070 पर्यंत जगात मुस्लिम धर्मियांची संख्या सर्वाधिक असेल असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...