पुणे : भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक बिंदूमाधव जोशी ( वय 85 ) यांचे आज (रविवार) वृद्धापकाळाने पुण्यात एका खासगी रुग्णालयात निधन झाले.
मागील वर्षभरापासून ते हृदयाच्या आणि फुफ्फुसांच्या विकाराने आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. प्रकृती खालावल्यामुळे जोशी यांना मागील आठवड्यात उपचारासाठी रुणालयात दाखल करण्यात आले होते. आज (रविवार) दुपारी सव्वा तीनला त्यांची प्राणज्योत मालवली. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव सायंकाळी 6 ते 8 दरम्यान कसबा पेठेतील ‘पसायदान‘ या बंगल्यात ठेवले जाणार असून त्यानंतर नवी पेठेतील ‘वैकुंठ‘ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील,