मुंबई : भारतरत्न डॉ.एस.एम. सुब्बुलक्ष्मी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते टपाल लिफाफ्याचे प्रकाशन करण्यात आले.
श्री षण्मुखानंद चंद्रशेखर सरस्वती सभागृह, माटुंगा येथे झालेल्या कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, सभेचे अध्यक्ष डॉ.व्ही. शंकर, मुंबई सर्कलचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल ए.के. दास, आमदार कॅप्टन तामीर सॅल्वन, पद्मभूषण पी.एस. नारायणस्वामी, सभेचे विश्वस्त आर.श्रीधर आदी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ.एस.एम. सुब्बुलक्ष्मी या कर्नाटकी तसेच भारतीय संगीताकरिता प्रेरणादायी आहेत. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. संगीताद्वारे आत्मा प्रकाशमान करणारा आवाज त्यांचा होता. त्यामुळे भारतीय संगीत, संस्कृती, परंपरा जतन करण्याचे मत मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या जपान दौऱ्यादरम्यानचे अनुभव यावेळी कथन केले.
यावेळी भारतरत्न एस.एम. सुब्बुलक्ष्मी शिष्यवृत्तीपात्र आर.के. रामकुमार यांना सोन्याची व्हायोलिन देऊन तर के.व्ही. प्रसाद यांना सोन्याचा तबला देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे 50 नवोदित विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले.