एम. एम. जी. सोशल फाउंडेशनच्यावतीने भानुप्रताप बर्गे यांच्या वाढदिवसानिमित विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमामध्ये मंगळवार पेठमधील कमला नेहरू रुग्णालयातील रुग्णांना फळे फाउंडेशनचे संस्थापक सतिश लालबिगे यांच्याहस्ते वाटप करण्यात आली . शिवाजीनगर बालगंधर्व चौकात मोफत दुचाकी व चारचाकी वाहनाची पी यु सी चाचणी शिबीर घेण्यात आले . या शिबिराचे उदघाटन स्थानिक नगरसेवक बाळासाहेब बोडके यांच्याहस्ते करण्यात आले . घोले रोडवरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनमध्ये अभिष्टचिंतन सोहळा पार पडला . या कार्यक्रमाचे संयोजन एम. एम. जी. सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा परविन लालबिगे , अक्षय लालबिगे , सिद्धान्त लालबिगे यांनी केले होते . कार्यक्रमयशस्वी करण्यासाठी स्वीकृत नगरसेवक विनोद निनारीया संभाजी देशमुख , बाबा गोनेवार , साजन त्रिभुवन , सुनिल पवार , जयंत मोडक , अजय मापारे आदींनी विशेष परिश्रम घेतले .
भानुप्रताप बर्गे यांच्या वाढदिवसानिमित विविध कार्यक्रमाचे आयोजन
Date:


