पुणे-
भाजपच्या कार्यकर्त्यांनी पथारी आणि फेरीवाल्यांविरोधात आंदोलन सुरु करून अखेर काळ एफ सी रस्ता पथारी मुक्त केला फर्ग्युसन रस्ता व जंगली महाराज रस्त्यावरील पदपथ हे अनधिक्रुत पथारीवाले,फेरीवाले यानी व्यापले असुन येथे नागरिकाना चालणे ही अवघड झाले आहे.एवढेच नव्हे तर येथे गुन्हे गारी ही वाढली आहे.याचा निषेध करणयासाठी व पुणे मनपा प्रशासनाच्या अकार्यक्षमते विरुद्ध आणी अतिक्रमणाना पाठीशी घालण्याच्या प्रव्रुत्तीविरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज आंदोलनाची घोषणा केली होती.मात्र परवा रात्री पासुनच मनपा ची यंत्रणा कमालीची कार्यक्षम झाली आणी दिवसातुन तीन चार वेळा कारवाई करुन फर्ग्युसन रस्त्यावरील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यात प्रशासनाला यश आले.
शनिवारी सायंकाळी 6 वाजता भाजप कार्यकर्त्यानी जोरदार घोषणा देत या रस्त्यावरील पदपथावरुन फेरी काढली तसेच गोपाळक्रुष्ण गोखले चौकात प्रशासनाविरुद्ध निदर्शने ही केली.निदर्शनांचे नेत्रुत्व शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर,उपाध्यक्ष दत्तात्रय खाडे,नगरसेविका निलीमा खाडे,माधुरीताई सहस्त्र्बुद्धे,चिटणीस अशोक मुंडे,रविंद्र साळेगावकर,शिवाजीनगर मंडल अध्यक्ष नाना मोरे,युवा मोर्चा अध्यक्ष अपूर्व सोनटक्के,योगेश बाचल,संदीप काळे,राजेश धोत्रे,व इतर कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना संदीप खर्डेकर म्हणाले “हा रस्ता नो होकर्स झोन” म्हणुन घोषित आहे,असे असताना येथील पदपथ अतिक्रमणानी भरलेले,तसेच पोलिसानी एक वर्षापूर्वी या रस्त्यावर पार्किंगला बंदी घालताना येथे अतिरेकी हल्ल्याची शक्यता असल्याचे सांगितले होते.मग अचानक येथील पदपथ पूर्णपणे अतिक्रमणानी व्यापले तरी पोलिस खाते व मनपा थंड कशी?यातुनच या सर्वांच्या आशिर्वादाने ही अतिक्रमणे झाली काय अशी शंका येते असे ही ते म्हणाले.
तर स्थानिक नगरसेविका निलीमाताई खाडे यानी आपण वारंवार मनपा कडे तक्रार करुन व सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित करुन ही कारवाई होत नसल्याने आंदोलन उभारले असुन आता सातत्याने कारवाई झाली नाही तर भाजप चे कार्यकर्ते रोज आंदोलन करतील असे जाहीर केले.
शहराच्या अन्य भागात ही पदपथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी भाजप आंदोलन उभारेल असे स्पष्ट करतानाच पथारीवाले धोरणाची अमलबजावणी करावी व अधिक्रुत पथारीवाल्यांचे पुनर्वसन करावे असे ही संदीप खर्डेकर म्हणाले.
उद्या ही या रस्त्यावर आंदोलन केले जाईल असे दत्ता खाडे,नाना मोरे,अशोक मुंडे यानी स्पष्ट केले.