पुणे : येथील भाजपच्या आमदारांसह कार्यकर्त्यांकडून जरी विरोध होत असला तरीही त्यांची दडपशाही झुगारत आज पुण्यातून संजय लीला भन्साळी यांच्या ‘ बाजीराव मस्तानी ‘ ला रसिकांनी तुडूंब गर्दी करीत डोक्यावर घेतले आहे . दरम्यान ‘बाजीराव-मस्तानी‘ या चित्रपटाच्या विरोधात आज (शुक्रवार) भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) युवा मोर्चाने पुण्यात सकाळपासून निदर्शने केली. यामुळे कोथरुड येथील ‘सिटी प्राईड‘ चित्रपटगृहाने आज सकाळचे ‘बाजीराव-मस्तानी‘चे ‘शो‘ रद्द केले. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव-मस्तानी‘ दाखविल्यास होणाऱ्या नुकसानास तुम्हीच जबाबदार असाल, असा इशारा भाजपने चित्रपटगृहांना दिला होता. यासंदर्भात भाजपच्या मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आम्ही आधीच विरोध केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसे पत्रही दिले होते. तरीही हा चित्रपट पुण्यात प्रदर्शित करण्याचा प्रयत्न झाला. यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी ‘बाजीराव-मस्तानी‘ बंद पाडला. यापुढेही आमची ही भूमिका कायम राहील.‘‘
भाजपच्या या कृती बद्दल रसिकांच्या भावना मात्र तीव्र होत्या. ‘बाजीराव-मस्तानी‘च्या ‘ट्रेलर‘मधील ‘पिंगा‘ या गाण्यात काशीबाई आणि मस्तानी यांना एकत्र नृत्य करताना दाखविले आहे. या गोष्टींवर आक्षेप घेण्यात आला होता.मात्र यामुळे कशीबाई ची महतीच मांडली गेली आहे;जी खुद्द बाजीरावांच्या आई हून अधिक बाजीरावांची काळजी घेते असे सिनेमात दिसले आहे . साताऱ्याच्या छत्रपतींनी ‘बाजीराव ‘ ची पेशवा पदी नियुक्ती केल्यापासून ते बाजीराव -मस्तानी यांचा अंत होईपर्यंतची कहाणी या सिनेमातून दाखविण्यात आली आहे . जसे ‘शिर्डी के साईबाबा ‘ या चित्रपटात शिर्डी तील काही लोकांनी साईबाबांचा छळ केल्याचे दाखविले आहे . त्याहून कमी प्रकारे मस्तानी चा छळ पुण्यातील तथाकथितांकडून झाल्याचे दाखविण्यात आले . या चित्रपटातून बाजीराव , काशी बाई यांची महती समजते आणि मस्तानीचे प्रेम ही अधोरेखित होते, असे सांगत रसिक भन्साळी यांनी चांगलाच सिनेमा दिल्याचे सांगत आहेत
सरकार तुमचे … चित्रपटावर बंदी आलेली नाही ; तुम्ही आणलेली ही नाही .. मग आम्हाला का पाहू देत नाहीत सिनेमा .. बंदी आल्यावर आम्ही नाही पाहणार आणि थिएटर वाले ही लावणार नाहीत . आम्ही आगावू बुकिंग केलेत . आम्हाला सिनेमा पाहण्यापासून अशापद्धतीने वंचित ठेवणे,सिनेमासाठी ठेवलेला आमचा वेळ आणि मारलेल्या चकरा केलेला प्रवास वाया घालविणे हे अती होते आहे असे रसिकांचे म्हणणे होते .
पहा नेमके काय पत्र दिले होते भाजपच्या आमदार यांनी – मुख्यमंत्री यांना … फोटो सह … तरीही हा सिनेमा प्रदर्शित झाला , यात तिकिटे काढून सिनेमाला आलेल्या रसिकांची काय चूक ?
एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यानंतरही याच भाजप आमदारांनी शनिवारवाड्यावर भन्साळी यांचा पुतळा जाळला होता त्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा ही दाखल केला होता .