मुंबई- मी घेतलेला निर्णय खडसे बदलतात -फिरवून टाकतात मग मी काय केवळ नावाचाच- मिरवायला मंत्री आहे काय असा सवाल करीत शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी राज्यामान्त्रीपादाचा राजीनामा पक्षाकडे पाठविला आहे .
त्यांच्या खात्याचे कॅबिनेटमंत्री एकनाथ खडसे हे आपल्याला काम करण्याची संधी देत नसल्याचे सांगत आपला राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव यांनी सर्व आमदार-खासदारांची बैठक पुढील दोन दिवसात मातोश्रीवर बोलावली असून त्यानंतर याबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, आम्हाला फक्त लाल दिव्याची गाडी दिली गेली आहे. महसूल राज्यमंत्री असूनही मदत व पुनर्वसन खाते दिलेले नाही. महसूल खात्यातही खडसेंनी कोणतेही काम करण्याची संधी दिली नाही. मी घेतलेल्या निर्णय अधिका-यांना फिरवण्यास सांगतात. त्यामुळे मी फक्त नावालाच मंत्री आहे असे मला वाटू लागले आहे. जर अशीच वागणूक देणार असेल तर आपण मंत्री म्हणून काम करण्यास इच्छुक नाही. त्यापेक्षा एक शिवसैनिक म्हणून लोकांची कामे करण्यास मला आवडेल असे संजय राठोड यांनी म्हटले आहे.