मुंबई – भाजपची सत्ता आल्यानंतर भविष्यात भाजपमध्ये बहुजन विरुद्ध उच्चवर्णीय असा सामना रंगणार असल्याची चुणूक दिसू लागली आहे , पुण्यातून विक्रमी साडेतीन लाखाच्या मताधिक्याने लोकसभेत निवडून गेलेल्या अनिल शिरोळे तसेच पर्वतीतून विधानसभेला विजय मिळवणाऱ्या माधुरी मिसाळ यांच्याकडे पक्षाचे दुर्लक्ष होत आल्याचा आरोप मराठा आणि बहुजन समाजातून होवू लागला आहे त्यातला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी बहुजन समाजाचा नेता हवा होता, या महसूलमंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याने या चर्चेला अधिक वाव मिळतो आहे विशेष म्हणजे शपथविधीनंतर अवघ्या दोन दिवसात खडसेंचे हे वक्तव्य प्रसारित झाले आहे . एकंदरीत ‘मोदी -शहा बोले महारष्ट्र भाजप डोले’ अशा स्थितीत भाजपचे ज्येष्ठ -वरिष्ठ नेते कार्यकर्ते भाजपची सत्ता येवूनही दुर्लक्षित होत असल्याने नाराजीचा सूर दिसत आहे
भाजपच्या १२२ आमदारांपैकी ४८ ओबीसी, १९ मराठा, १९ अनुसूचित जाती, ६ अनुसूचित जमाती, २७ खुल्या गटाचे आमदार असताना नैसर्गिक न्यायाने बहुजन समाजाचीच व्यक्ती मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसायला हवी होती, असा सूर पक्षाच्या वर्तुळात उमटतो आहे. यामुळे सत्तेवर विराजमान होऊन तीन एक दिवस झाले नसताना भाजपमध्ये दोन तट पडल्याचे दिसत आहे आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत फडणवीसांबरोबर एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार व पंकजा मुंडे होत्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने उरलेल्या चारपैकी सर्वात नाराज दिसत आहेत ते खडसे. शपथविधी सोहळ्यातही खडसेंची देहबोली निराश असल्याच्या भावना दाखवत होती. पंढरपूरला सोमवारी कार्तिकी एकादशी निमित्त पांडुरंगाची पूजा खडसेंच्या हस्ते झाली. या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसेंनी मुख्यमंत्रिपदावर बहुजनांचा सूर आळवून आपला हक्क होता, असे बोलून दाखवले.
खडसे हे भाजपचे सर्वात ज्येष्ठ नेते असून त्याचा सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष म्हणून काम करतानाचा अनुभव दांडगा आहे. विधिमंडळात खडसेंच्या मागच्या बाकावर बसून फडणवीसांनी कामकाजाचे धडे गिरवले. विशेष म्हणजे फडणवीसांना विधिमंडळातील सर्वोत्तम आमदाराचा पुरस्कार मिळाला होता.
दरम्यान विश्वनाथ प्रताप सिंह हे पंतप्रधान असताना मंडल आयोगाचा प्रश्न सुटला होता, असे विचार ओबीसी चळवळीतील नेते नितीन चौधरी यांनी मांडले.