नवी दिल्ली- दिल्लीतील निवडणुकीच्या महाभारतात आम आदमी पार्टीचे(आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर प्रचारकी हल्ल्यासाठी बनविलेल्या व्यंगचित्राने भाजपाची अडचण वाढविली आहे. या व्यंगचित्रात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातलेला असल्याने वाद पेटला आहे. ‘आप’ने या मुद्द्यावरून लक्ष्य बनविताच भाजपाला उत्तर देणे अवघड झाले आहे. केजरीवाल मुुलांच्या डोक्यावर हात ठेवत शपथ घेत असतानाच काँग्रेसशी हातमिळवणी करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे. अण्णांच्या प्रतिमेला हार दाखवत भाजपाने जणू त्यांची हत्या केली असून, त्याबद्दल भाजपाने माफी मागावी, अशी मागणी केजरीवाल यांनी केली
भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या जाहिरातीत आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य बनविताना एका जाहिरातीत समाजसेवक अण्णा हजारे यांच्या छायाचित्राला चक्क हार घातल्याने भाजप पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
भाजपने एका निवडणूक जाहिरातीत केजरीवाल हे मुलांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेत आहेत असे दाखविले आहे. त्यांच्या बाजूला एका स्त्रीचे चित्र असून, तिच्या डोक्यावरील टोपीवर कॉंग्रेस असे लिहिले आहे. मागे अण्णांचे छायाचित्र असून, त्याला दिवंगत नेत्यांना घालतात तसा हार घातलेला दाखविला आहे. “सत्तेसाठी मी मुलांची खोटी शपथ घेईन व तरीही रात्रंदिवस प्रामाणिकपणाचा डांगोरा पिटेन‘ असे केजरीवाल म्हणताना यात दाखविले गेले आहेत.