श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील भयंकर पुरामुळे २५0 लोकांचा बळी गेला असला तरी येथील सरकारी रुग्णालयांत अशा कठीण प्रसंगातही ३ हजार ५00 बालकांनी सुखरूप जन्म घेतल्याची सुखद माहिती पुढे आली आहे. ४ ते २0 सप्टेंबरदरम्यान काश्मीरच्या विविध रुग्णालयांत जवळपास २ हजार ३00 बालकांनी नैसर्गिकपणे, तर १ हजार २६0 बालकांनी शस्त्रक्रियेद्वारे जन्म घेतला, अशी माहिती अधिकार्यांनी दिली आहे. २0 सप्टेंबर रोजी संपलेल्या पंधरवड्यात संपूर्ण काश्मीर खोर्यातील जिल्हा रुग्णालयांत सुमारे ५ लाख ७७ हजार ५९५ रुग्ण आले होते. त्यातील ३४ हजार ६00 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. त्यापैकी १ हजार ४३५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली, तर १ लाख ३ हजार १६0 रुग्णांची प्रयोगशाळा चाचणी करण्यात आली, असेही या अधिकार्याने स्पष्ट केले. पूरस्थितीदरम्यान स्थापन करण्यात आलेल्या १४५ वैद्यकीय शिबिरे स्थापन करण्यात आली. यापैकी ६२ शिबिरे श्रीनगरमध्ये लावण्यात आली होती.