पुणे-
अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे शिष्टमंडळ दि. १६/१२/१५ रोजी नागपूर येथील संघ
मुख्यालय, महाल येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री मोहनजी भागवत यांना भेटले व त्यांना
अ.भा.ब्रा.म. च्या कार्याची तपशीलवार माहिती देण्यात आली. अशी माहिती प्रवक्ता संदीप खर्डेकर यांनी येथे दिली
ते म्हणाले , महासंघाच्या कार्याचा आढावा घेतल्या नंतर मोहनजींनी ब्राह्मण महासंघाचे कार्य योग्य दिशेने
चालले आहे व ह्याच दिशेने काम चालत राहावे अशी आशा व्यक्त केली आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री
गोविंद कुलकर्णी व सरसंघचालक यांच्या मधे राष्ट्रीय पातळीवरील विविध विषयांवर चर्चा झाली.
ब्राह्मण महासंघाने ब्राह्मणांच्या हिताबरोबरच राष्ट्रातील प्रत्त्येक घटकाच्या हिताचे कार्य करावे,
देशातील सर्व घटकांना सोबत घेऊन समोर जाण्याचे कार्य करावे असे आवाहन यावेळी मोहनजींनी केले.
सरसंघचालकांनी आरक्षणाच्या संदर्भात केलेले वक्तव्य योग्यच होते, त्या वक्तव्याचा राजकीय
लाभाकरिता दुरुपयोग करण्यात आला असे मत ब्राह्मण महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी भागवतांकडे व्यक्त केले .
या वेळी शाल व श्रीफळ देऊन महासंघाच्या वतीने सरसंघचालकांचा सत्कार करण्यात आला. या
शिष्टमंडळामध्ये प्रदेश कार्यकारिणी सदस्य केशवजी भास्करे महाराष्ट्राचे युवा प्रदेश अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत
धडफळे, उपाध्यक्ष श्री मिथिलेश पाध्ये, चिटणीस भूषण पांढरे, जिल्हा सरचिटणीस श्री आनंद घारे,
कोषाध्यक्ष श्री भूषण बाभरेकर, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सौ. संपदा गोडबोले उपस्थित होते.

