पुणे :
अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल ने महानगरपालिका शिक्षण मंडळ व जिल्हाक्रीडाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित १४ वर्षांखालील बेसबॅाल स्पर्धेत गणेशखिंड मॉडर्न हायस्कूलचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
अंतिम सामन्यात उर्दू हायस्कूलने गणेशखिंड संघाचा १२-१ अशा होमरनने पराभव केला. विजयी संघाकडून यासिर शेख, आकिब उस्मानी, आफताब इनामदार व फझिल अन्सारी यांनी प्रत्येकी २ होमरन केल्या. पराभूत संघाकडून पार्थ शेलार याने एकमेव होमरन केली.
उपांत्य फेरीत मॉडर्न गणेशखिंड संघाने मॉडर्न शिवाजीनगर संघाचा ११-१, तर अँग्लो उर्दू बॅाईज संघाने एम. सी. एस. इंग्लिश प्रायमरी स्कूलचा ७-३ होमरनने पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार , महाविद्यालयाच्या प्राचार्य परवीन शेख , एस ए इनामदार , आझम स्पोर्टस् अकादमीचे संचालक गुलजार शेख, खालिद बागवान , मजीद शेख , दानिश सय्यद यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.

